Water Shortage : पाणी प्रश्‍नावरून साकोर्ड्यात संताप; विहिरी आटल्याने पंप बंद

Water Shortage : सुर्ला, बोळकर्णे, बट्टर, मेस्तवाडा, तयडे, धारगेत वणवण
Water
WaterDainik Gomantak

Water Shortage :

तांबडीसुर्ला, मधलावाडा, साकोर्डा येथे साडेचार कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या १ एमएलडी पाणी प्रकल्पाला कच्चे पाणी पुरवणाऱ्या विहिरीतील पाणी आटल्याने शनिवारपासून या विहिरीतून पाणी खेचणारे पंप बंद करण्यात आले आहेत.

त्यामुळे सुर्ला, मधलावाडा, बोळकर्णे, बट्टर, मेस्तवाडा, तयडे व धारगे भागातील पाणी पुरवठा ठप्प झाला आहे.

१० मे २०२३ रोजी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांच्या हस्ते मधलावाडा, साकोर्डा येथे साडेचार कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या १ एमएलडी पाणी प्रकल्पाचे लोकार्पण झाले होते. आधी बंधारा अडवा व मग प्रकल्प सुरू करा, अन्यथा नदीचे पाणी उन्हाळ्यात आटण्याची शक्यता ग्रामस्थांनी त्यावेळी व्यक्त केली होती, परंतु प्रकल्प आधी चालू तरी करूया, पुढची चिंता आताच कशाला, असे म्हणत हा प्रकल्प कार्यान्वित केला होता.

परंतु या प्रकल्पातील विहिरींमधील जलसाठा नंतर आटल्यामुळे गेल्या शनिवारी पाणी खेचणारे पंप बंद करावे लागल्याने ग्रामस्थांची शक्यता खरी ठरली आहे.

Water
New Aerocity In Goa: दिल्ली धर्तीवर गोव्यात एरोसिटी; नव्या पर्यटन संधी निर्माण होणार- पर्यटन सचिव

...तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करणार : सरपंचांची ग्वाही

साकोर्डा गावातील पाण्याचा प्रश्‍न सुटत नाही, तोपर्यंत ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन आमदार गणेश गावकर आणि सरपंच प्रिया खांडेपारकर यांना दिले होते. विहिरीचे पाणी आटल्याने पंप बंद केले असले, तरी अद्याप पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही.

Water
New Aerocity In Goa: दिल्ली धर्तीवर गोव्यात एरोसिटी; नव्या पर्यटन संधी निर्माण होणार- पर्यटन सचिव

विहिरीच्या पाण्यात घट झाल्याने नदीपात्रातील पाणी विहिरीत घेण्यासाठी शनिवारी सकाळी जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्रात खोल खड्डा खोदण्याचे नियोजन अधिकाऱ्यांनी केले होते. याचा सुगावा मधलावाडा ग्रामस्थांना लागताच त्वरित नदीकाठी धाव घेत त्यांंनी खड्डा खोदण्यास मनाई केली. तसेच यासाठी जलस्रोत खात्याची लेखी परवानगी घेतली का, अशी विचारणा साबांखाचे कनिष्ठ अभियंता बाबशेट यांना केली.

परंतु ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत संबंधित खात्याची लेखी परवानगी प्रत सादर करत नाही तोपर्यंत यंत्र जाग्यावरून हलवू देणार नाही, असा पवित्रा घेतला. दोन दिवसांत प्रत सादर करण्याचे आश्वासन कनिष्ठ अभियंत्याने ग्रामस्थांना दिले आहे. पाण्याच्या प्रश्नावरून वातावरण तापण्याची शक्यता अाहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com