Water Scarcity : मुरगाव तालुक्यात लोकांचे पाण्यासाठी हाल

चार दिवस नळ कोरडे : वास्को, चिखली, दाबोळीत पाण्याचे दुर्भिक्ष; रहिवाशांत संताप
Water Scarcity
Water ScarcityGomantak Digital Team
Published on
Updated on

वास्को : मुरगाव तालुक्यात लोकांचे पाण्याविना हाल झाले असून गेले चार दिवस वास्को, चिखली, दाबोळी, नवेवाडे,वाडे, मांगोरहील, बायणा,सडा व इतर भागातील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

गेले चार दिवस नळाला पाणी येत नसल्याने मुरगाव तालुक्यातील लोकांचे पाण्याविना हाल झाले आहेत. रविवारी वीज पुरवठा खंडित होणार असल्याने पाणी नसणार, हे आधीच जाहीर करण्यात आल्याने लोकांनी आपला रविवार पिकनिकला जाऊन घालवला.

Water Scarcity
Vasco News : थकबाकीसह सेवानिवृत्ती वेतनही वेळेवर द्या

मात्र, शनिवारपासूनच पाणी गायब झाल्याने आज चार दिवस लोक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता नरेश पैंगीणकर यांनी काही तांत्रिक कारणांमुळे पाण्याचा पुरवठा झाला नसल्याचे सांगितले. आज मंगळवारी रात्री पाणी पुरवठा पुर्ववत के ला जाणार असल्याचे ते म्हणाले.

Water Scarcity
Shooting At Vasco: मोठी बातमी! वास्कोत चोरट्यांचा पोलिसांवर गोळीबार; एक पोलिस जखमी, चोरटे फरार

टॅंकरच्या पाण्याचीही भीती

लोक टँकरचे पाणी उपयोगात आणण्यास घाबरू लागले आहेत. कारण सांकवाळ येथे मलनिस्सारण प्रकल्पात सांडपाणी नेत असलेल्या टँकरमधून पाणी भरून लोकांना पाणी पुरवण्यात आल्याचे उघड झाले होते. तेव्हापासून लोकांना टँकरमधून पाणी घेणे भीतीदायक वाटू लागले आहे. नाईलाजास्तव लोक चार दिवस पाणी नसल्याने टॅंकरच्या पाण्याचा उपयोग करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com