Subhash Shirodkar|Goa News
Subhash Shirodkar|Goa NewsDainik Gomantak

Subhash Shirodkar: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जलस्रोतमंत्री म्हणाले, राज्‍यात सातवे धरण उभारणार...

सदर धरण काजुमळ धारबांदोडा येथे बांधले जाईल.
Published on

गोव्यात 30 हजार शेतकऱ्यांनी कृषी उद्योगाकडे वळावे हे आपले ध्येय आहे. त्यासाठीच गोव्यात धरणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. 23 डिसेंबर 2023 पर्यंत म्हणजे आजपासून एका वर्षात गोव्यात सातव्या धरण उभारणीच्या कामाला सुरुवात करण्याचे आपले ध्येय आहे, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

मडगावी एका कार्यक्रमाला आल्यावेळी या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. जीवनात पाण्याला जास्तीत जास्त महत्त्व आहे. पाण्याचे जतन व योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. गोव्यात कृषी उद्योगाला पूरक वातावरण आहे.

Subhash Shirodkar|Goa News
Goa University: गोवा विद्यापीठाचा कोकणी केंद्राशी सामंजस्य करार

आपण जलस्रोत मंत्रिपदाचा ताबा घेतल्यापासून पाण्याच्या व्यवस्थापनाला महत्त्व देत आहे, असे शिरोडकर म्‍हणाले. सदर धरण काजुमळ धारबांदोडा येथे बांधले जाईल. त्यासाठी लवकरच माती चाचणी सुरु केली जाईल.

तसेच धरणाच्या खर्चाचे अंदाजपत्रकही तयार केले जाईल, असे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले. गोव्यात सहा धरणे आहेत, त्यातील अंजुणे, साळावली ही महत्त्वाची धरणे आहेत, असेही शिराेडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com