Khandepar Canal: ..अखेर खांडेपार कालव्यातून सोडले पाणी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू

Kulem Khandepar Canal: कुळे व मोले पंचायत क्षेत्रातील बागायती व शेतीसाठी हे पाणी उपयुक्त ठरत आहे. सांगोड येथे लाखो चौरस मीटर जमिनीत ४५ शेतकऱ्यांकडून भात शेतीची लागवड करण्यात येते.
Khandepar Canal
Khandepar CanalDainik Gomantak
Published on
Updated on

Khandepar Canal Water Release

कुळे: कुळे पंचायत क्षेत्रातून वाहणाऱ्या खांडेपार कालव्यात बुधवारपासून पाणी सोडण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. धारबांदोडा तालुक्यातील जलस्रोत खात्याचे कनिष्ठ अभियंता सागर नाईक व अन्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

कुळे व मोले पंचायत क्षेत्रातील बागायती व शेतीसाठी हे पाणी उपयुक्त ठरत आहे. सांगोड येथे लाखो चौरस मीटर जमिनीत ४५ शेतकऱ्यांकडून भात शेतीची लागवड करण्यात येते. या कालव्याच्या पाण्याचा चांगला वापर शेतकरी आपल्या बागायतीत करून घेत आहेत.

Khandepar Canal
Goa Mining: पिळगावमधील आंदोलन मिटविण्यासाठी प्रयत्न जारी; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

हा कालवा पोर्तुगीज काळात बांधलेला असून या कालव्याला अनेक ठिकाणी गळती लागली होती. धारबांदोडा जलस्त्रोत्र खात्याचे अधिकारी सदानंद नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता सागर नाईक यांनी कंत्रांटदारकडून कालव्याला पडलेली भोके दुरुस्त करण्यात आल्याचे सागर नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com