Vasco: वास्कोत लाखो लिटर पाणी वाया! भूमिगत वीजवाहिनीच्या कामातील हलगर्जीपणाचा फटका

Vasco Water Issue: वास्कोत भूमिगत वीजवाहिन्या बसविण्याच्या कामामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
Vasco Water Issue
Vasco Water LeakageDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Water loss Public Works Department Underground power cable installation vasco

वास्को: वास्कोत भूमिगत वीजवाहिन्या बसविण्याच्या कामामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. भूमिगत वीजवाहिन्यांचे काम करणारे कंपनी व कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे सार्वजनिक बांधकाम पाणी विभागाचे दररोज मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने विभागाने नाराजी व्यक्त केली आहे.

वास्कोत भूमिगत वीजवाहिनी जोडणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूस खोदकाम सुरू आहे, परंतु पूर्वसुचना देऊनसुद्धा भूमिगत वीजजोडणीचे काम करणारे संबंधित अधिकारी, दररोज जास्त करून सार्वजनिक बांधकाम पाणीपुरवठा विभागाच्या वाहिनीचे नुकसान करीत आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाचे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

Vasco Water Issue
Vasco News: बायणा, सडा येथील 600 कुटुंबांना मिळणार घरांचा मालकी हक्क; गोवा पुनर्वसन मंडळाचा महत्वाचा निर्णय

यामुळे अनेकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. वीज विभागाने आपले काम करताना पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून काम करणे गरजेच आहे. काल रात्री भूमिगत वीज वाहिनींचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने वास्को न्यायालयासमोरील भूमिगत पाण्याची वाहिनी तोडल्याने वास्को शहरातील काही भागात कमी प्रमाणात पाणी उपलब्ध झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Akhada Water Supply
Goa Water Storage
Goa Rainfall Deficit 2026
 Shappora River water Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com