वास्को: सिने वास्को नजीकची जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेल्याचा प्रकार समोर आला आहे. वाया जाणारे पाणी टी.बी. कुन्हा चौकापर्यंत पसरल्याने याचा विक्रेत्यांना त्रास सोसावा लागला आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या शलाका कांबळी यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागाला माहिती दिली यानंतर ही जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जलवाहिनी पहाटेच्या सुमारास सिने वास्को नजीकची फुटली असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या जलवाहीनीतून मोठ्या प्रमाणात बाहरे पडणारे पाणी जवळच्या गटारातून टी.बी. कुन्हा चौकापर्यंत गेले होते. यामुळे गटारे बुजली गेल्याने पाण्याचा निचरा योग्यरित्या होऊ शकला नाही. त्यामुळे कुन्हा चौकातील रस्त्यावर पाणी जमा झाले. आणि दुकानासमोर पाणी जमा झाल्याने विक्रेत्यांना त्रास सहन करावा लागला.
वाहत असलेल्या पाण्यातून पादचाऱ्यांना वाट काढत पुढे जावे लागत असल्याचं चित्र यावेळी दिसत होते. तर दुकानाच्या आतमध्ये पाणी शिरू नये, यासाठी काही विक्रेत्यांना धावपळ करावी लागली. यानंतर जलवाहिनी फुटल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाला देण्यात आल्यावर पर्यवेक्षक व कामगारांनी तेथील जलवाहिनी दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे. ज्याच्यामूळे जलवाहीन्या पुर्वरत होण्यास मदत होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.