Water leakage near Dabolim Junction traffic signal
Water leakage near Dabolim Junction traffic signalDainik Gomantak

दाबोळीत वालेस जंक्शन वाहतूक सिग्नलजवळ पाण्याची नासाडी

शेकडो लिटर पाणी वाया; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
Published on

दाबोळी येथे वालेस जंक्शन वाहतूक सिग्नल जवळ सार्वजनिक बांधकाम विभागाने उघड्यावर सोडलेल्या पाण्याच्या पाईप वाॅल्व मधून शेकडो लिटर पाणी वाया जात असल्याचे पाहून लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे. कारण एकीकडे लोकांची पाण्यासाठी वणवण व दाबोळी येथे आज झालेली पाण्याची नासाडी आणि त्या पाण्यात आंघोळ करून मजा लुटताना परप्रांतीयांना पाहून लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Water leakage near Dabolim Junction traffic signal
कदंबवरील झाडे तोडल्याबद्दल चिंबल स्थानिकांत चिंता

येथील राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) वालेस जंक्शन सिग्नल जवळ सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नवीन पाण्याची पाईप लाईन जोडणी करण्याचे काम चालू असून या ठिकाणी असलेले मोठे पाईप वाॅल्व खोदकाम करून उघड्यावरच सोडण्यात आले आहे. दरम्यान येथील काही परप्रांतीय मजूर लोक उघड्यावर सोडलेल्या पाण्याचा वाल्व सोडून पाण्याच्या फवाऱ्यात उघड्यावर आंघोळ करतात. हे दृष्य बघून या महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी मात्र हळहळ व्यक्त केली आहे. कारण मुरगाव तालुक्यात सगळीकडे लोक पाण्यासाठी वणवण हाल-अपेष्टा सहन करतात. दिवसाला एक तास पाणी आले तर जास्त याप्रमाणे लोक दिवस काढतात. पाणी कमी प्रमाणात आले तरी पाण्याचे भरमसाठ बिल लोकांच्या माथी मारण्याचे प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) केले जाते.

दरम्यान आजचा दाबोळी येथील प्रकार पाहता लोकही अचंबित झाले. कारण पाण्याचा फवारा इतका जबरदस्त होता की तो दोन ते तीन मीटर उंचीवर वाहत होता. यावर लोकांनी अंदाज बांधला आहे की पाणी असतानाही सार्वजनिक बांधकाम पाणी विभाग लोकांना पाणी वेळेवर सोडत नसल्याचे बोलले जाते. हे पाणी जाते कुठे? मोठमोठ्या कंपन्यांना पाणीपुरवठा तर होत नाही ना? असा अंदाज लोकांनी व्यक्त करून नाराजी व्यक्त केली आहे. सर्वजनिक बांधकाम विभागाचे होत असलेल्या दुर्लक्षामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. तसेच शेकडो लिटर पाण्याची होणारी नासाडी व परप्रांतीयांकडून होत असलेली नाशाडी पाहून लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे. या वाया जाणाऱ्या पाण्याचे बिल मात्र लोकांच्या माथी मारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे केले जाते यात तिळमात्र शंका नसल्याचे लोकांकडून बोलले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com