सांगे : साळावली धरण उशाशी आणी कोरड घशाशी, अशी अवस्था सांगेवासीयांची झाली असून गेले पाच दिवस भाटी पंचायत भागातील विलीयण, कुमारी, व्हालसे या भागांत पाणीपुरवठा बंद पडलेला आहे. स्थानिक प्रशासनाने आश्वासन देऊनही पर्यायी व्यवस्था केलेली नसल्याने अखेर स्थानिक पंचायत सदस्य अश्विनी गावकर यांनी स्वतःच्या खर्चाने पाणी टँकर मागवून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला.
गेले पाच दिवस पाणीपुरवठा होत नसल्याचे सांगूनही स्थानिक प्रशासनाला पाणी समस्यांची गांभीर्यता कळत नसल्याने ग्रामस्थ प्रशासनाला दोष देत आहेत. कूपनलिकांद्वारे होणारा पाणीपुरवठा गेले पाच दिवस बंद आहे. जलस्रोत खात्याला सांगूनही आश्वासनाशिवाय काहीच दिले नाही. पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरविण्याच्या ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.कुमारी येथील कूपनलिकेत तीन पंप पडलेले असताना आता चौथा पंप कूपनलिकेत घालण्यात आला. परंतु तो पंप पाणी खेचत नसल्याने गेल्या पाच दिवसांत कुमारी, विलियण, व्हालसे भागात नळ कोरडे पडले आहेत.
धरण असूनही गाव तहानलेला
साळावली जलशुद्धीकरण प्रकल्पाचे पाणी दक्षिण गोव्याला पुरविले जात आहे; पण ज्या मतदारसंघात साळावली धरण आहे, त्या गावांत पाणी-पाणी करण्याची वेळ आली आहे. एकवेळ आजूबाजूला विहीर असल्यास ग्रामस्थ समजून घेतात; पण जवळ विहीर नसल्यास काय करावे.
गेले पाच दिवस पाण्याविना ग्रामस्थ हाल काढत असताना स्थानिक प्रशासनाला परिस्थितीची जाणीव होत नाही. केवळ पाणीपुरवठा करण्याची पोकळ आश्वासने दिली जातात. आता परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी पाणी विभागावर मोर्चा काढल्याशिवाय प्रशासनाचे डोळे उघडणार नाहीत.
अनिल काकोडकर, स्थानिक नागरिक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.