Siolim Water Dispute: शिवोलीत पाणी प्रश्न पेटला, वाल्व ऑपरेटरवर हल्ला करण्याचा प्रयत्न

मागील 2 महिन्यांपासून याठिकाणी पाणी समस्या भेडसावत आहे.
Siolim Water Dispute
Siolim Water DisputeDainik Gomantak
Published on
Updated on

Siolim Water Dispute शिवोलीत पाणी टंचाईच्या कारणास्तव वादंग झाल्याचा प्रसंग घडला आहे. नियमित पाणी पुरवठा न झाल्याने संतप्त झालेल्या रहिवाश्यांनी वाल्व ऑपरेटरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय.

सदर पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने लोकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सदर भागात गेल्या कित्येक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून ग्रामस्थ मेटाकुटीला आले आहेत. सध्या कडक उन्हाळा सुरू झाला असून पाण्यासाठी कुठे जायचे, असा मोठा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.

मागील 2 महिन्यांपासून याठिकाणी पाणी समस्या भेडसावत आहे. याठिकाणी ठराविक वाड्यांना पाणी सोडण्यासाठी दिवस नेमून दिलेले आहेत. असे असूनही नेमून दिलेल्या दिवशीही पाणी येत नसल्याने रहिवासी चांगलेच संतप्त झाले.

आज PWD खात्याची माणसे पाणी सोडण्यासाठी येताच ग्रामस्थांनी त्यांना घेराव घातला. वाल्व ऑपरेटरवर नेमून दिलेल्या दिवशी पाणी सोडत नसल्याचा प्रकार घडताच संतप्त झालेल्या रहिवाश्यांनी वाल्व ऑपरेटरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच या ऑपरेटरची बदली करण्यात यावी असाच सूर नागरिकांमधून येत होता.

Siolim Water Dispute
BJP Foundation Day:...आणि ब्रश हाती घेऊन मुख्यमंत्री सावंतांनी 'कमळ'मध्ये भरले रंग

संबंधित ऑपरेटर नेमून दिलेल्या दिवशी आणि ठरवलेल्या वाड्यांना पाणी न सोडता अन्य वाड्यांना पाणी सोडतो. परिणामी आम्हाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्याची ही मनमानी बरीच वर्षे सुरु असून त्याची बदली करण्यात यावी अशी संतप्त मागणी येथील ग्रामस्थांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com