Nilesh Cabral: ...अन्यथा गोवेकरांच्या नळाचे पाणी होणार बंद

थकबाकीदारांना एक महिन्यात ओटीएस योजनेत नाव नोंदविणे आवश्‍यक आहे.
Nilesh Cabral
Nilesh Cabral Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Water Bills: सार्वजनिक बांधकाम खात्याने पाणी बिले न भरलेल्या ग्राहकांसाठी एक रकमी समझोता (वन टाईम सेटलमेंट तथा ओटीएस) सुरू केली आहे. जे ग्राहक 31 जानेवारीपर्यंत या योजनेत सहभागी होणार नाहीत, त्यांची नळ जोडणी 1 फेब्रुवारीपासून तोडली जाईल, असे मंत्री निलेश काब्राल यांनी सांगितले.

साबांखातर्फे 2021मध्ये ओटीएस योजना सुरू झाली तेव्हा 114 कोटींचे पाणी बिल थकीत होते. त्यातील काही बिले भरली गेली. सध्या साबांखाची 92.50 कोटींचे थकीत आहे. थकबाकीदारांची संख्या 44 हजार एवढी आहे.

Nilesh Cabral
Vasco: स्कूबा डायव्हिंग करताना पर्यटकाचा दुर्देवी मृत्यू

कोणत्याही स्थितीत ही थकबाकी वसूल करण्याचे आव्हान साबांखापुढे आहे त्यामुळे साबांखा मंत्र्याने थेट नळ जोडणी तोडण्याचेच हत्यार उपसले आहे. थकबाकीदारांना एक महिन्यात ओटीएस योजनेत नाव नोंदविणे आवश्‍यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Akhada Water Supply
Goa Water Storage
Goa Rainfall Deficit 2026
 Shappora River water Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com