सासष्टी, मडगाव येथील कोंब भागात कित्येक ठिकाणी सिवरेज चेंबरची झाकणे उघडल्याने त्यातून सिवरेजचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे.
विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या चेंबरमधून असेच पाणी गेल्यावर्षीही वाहत होते व त्यानंतर सिवरेज व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी वरचेवर दुरुस्ती केली होती. यंदाही तीच परिस्थिती गेले १५ दिवस उद्भवली आहे. शिवाय काही खासगी निवासी सोसायटीतील सिवरेज चेंबर उघडे पडून त्यातूनही पाणी वाहू लागले आहे.
लोकांना त्यातून वाट काढत जावे लागत आहे. आज सकाळी मडगावचे आमदार दिगंबर कामत व स्थानिक नगरसेवक सगुण नायक यांनी पाहणी केली.
यासंदर्भात बोलताना कामत म्हणाले की, आपण हा प्रश्र्न विधानसभेत उपस्थित केला असून शिरवडे येथील सिवरेज प्लांटची क्षमता वाढविण्याची मागणी सरकारकडे केली आहे. शिरवडे येथील सिवरेज प्लांट पूर्णपणे भरल्याने मडगावमधील सिवरेज पाईपलाईनवर त्याचा परिणाम झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.