Mumbai Goa Vande Bharat Express: मुंबई गोवा वंदे भारत खरचं रस्ता चुकली होती का? अखिलेश यादव यांचीही टीका, रेल्वेने दिले उत्तर

Mumbai Goa Vande Bharat Express: अखिलेश यांनी शेअर केलेली माहिती चुकीची असल्याचे सांगत मध्य रेल्वेने स्पष्टीकरण दिले.
Mumbai Goa Vande Bharat Express: मुंबई गोवा वंदे भारत खरचं रस्ता चुकली होती का? अखिलेश यादव यांचीही टीका, रेल्वेने दिले उत्तर
Mumbai Goa Vande Bharat ExpressDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Goa Vande Bharat Express

मुंबई: येथून गोव्याला (मडगाव) जाणारी वंदे भारत ट्रेनला सोमवारी (२३ डिसेंबर) दीड तास विलंब झाला. मडगावला जाणारी ही सेमी हायस्पीड ट्रेन रस्ता चुकल्याच्या बातम्या अनेक राष्ट्रीय माध्यमांनी दिल्या. रस्ता चुकल्यानेच ट्रेनला विलंब झाल्याचा कयास अनेकांनी बांधला. यात समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव देखील बळी पडले. त्यांनी देखील ट्रेन रस्ता चुकल्याची बातमी शेअर करत भाजपवर टीका केली.

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता गेल्या वर्षी मुंबई मडगाव वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात आली आहे. मध्य मुंबईतून पनवेलमार्गे ही ट्रेन गोव्यातील मडगावपर्यंत धावते. दरम्यान, सोमवारी ही ट्रेन रस्ता चुकल्याचा दावा करण्यात आला. सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी देखील ट्रेन चुकल्याची बातमी शेअर केली.

यावर अखिलेश यांनी शेअर केलेली माहिती चुकीची असल्याचे सांगत त्यांना स्पष्टीकरण दिले. अखिलेश यांनी 'भाजपचे डबल इंजिन नव्हे डबल ब्लंडर सरकार आहे. भाजपने देशाचा मार्ग देखील चुकीच्या मार्गावर आणून ठेवलाय', अशी टीका यादव यांनी केली.

Mumbai Goa Vande Bharat Express: मुंबई गोवा वंदे भारत खरचं रस्ता चुकली होती का? अखिलेश यादव यांचीही टीका, रेल्वेने दिले उत्तर
Mumbai-Goa Vande Bharat Express: दीड तास उशीराने धावली मुंबई - गोवा वंदे भारत एक्सप्रेस; प्रवाशांचा खोळंबा

"सर, ही माहिती चुकीची आहे. लोहमार्गावर आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे ट्रेन वळविण्यात आली होती. ट्रेन निर्धारित वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सुटली आणि मडगाव येथे देखील वेळेत पोहोचली होती", असे स्पष्टीकरण मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने दिले आहे.

Mumbai Goa Vande Bharat Express: मुंबई गोवा वंदे भारत खरचं रस्ता चुकली होती का? अखिलेश यादव यांचीही टीका, रेल्वेने दिले उत्तर
Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गावर धावत्या बसला आग; 34 प्रवासी थोडक्यात बचावले, बस, साहित्य जळून खाक

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मडगाव वंदे भारत ट्रेन सीएसटीवरुन सुटल्यानंतर दिवा येथे आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे एरव्ही पनवेलमार्गे धावणारी ट्रेन कल्याणमार्गे वळवण्यात आली. यामुळे ट्रेनला जवळपास ८७ मिनिटांचा विलंब झाला. दरम्यान, काही माध्यमांनी ट्रेनचा मार्ग चुकल्याची बातमी चालवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com