गोवा शिपयार्ड लिमिटेडला यूपीस्थित मजूर पुरवणाऱ्या 23 वर्षीय मूळ जौनपूरचा शक्तीमान बिंडला वास्को पोलिसांनी ताब्यात घेतले यानंतर त्याला गोपाल गंज पोलिसांच्या ताब्यात दिले. बिंड हा उत्तर प्रदेशातील सराईत गुन्हेगार होता. विविध मालमत्ता आणि देहविक्रीच्या गुन्ह्यात त्याचा हात असुन पोलिस त्याच्या मागावर होते.
(Wanted Accused From UP in custody of Goa Police )
गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारी विश्वाने डोके वर काढले आहे. विनयभंग, चोरी, गोळीबार, बलात्कार, खून आणि अमली पदार्थांचा सुळसुळाट यासारख्या घटनांमुळे सामाजिक अंतरंगात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
गोव्यातील वाढत्या गुन्हेगारीमागे राज्याबाहेरील लोकांचा हात
विरोधकांनीही या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत असून गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या घटनांमधून राज्याबाहेर लोक सहभागी असल्याचे सांगितले आहे.
राज्यात वाढत्या गुन्हेगारीवर मुख्यमंत्र्यांनी जरी असं स्पष्टीकरण दिलं असलं तरीही सध्या चांगलच गाजत असलेल्या सोनाली फोगट आणि अवैध वाळू उपसा प्रकरणातील आरोपींमध्ये गोव्यातील लोकच सहभागी असल्यानं मुख्यमंत्री केवळ बचावासाठी सावध प्रतिक्रिया देत असल्याचंही बोललं जात आहे. राज्यात गुन्हेगारी फोफावली आहे.
अल्पवयीन मुलींचा विनयभंग आणि बलात्कार, कुडचडेत वाळू माफियांमधील अंतर्गत वादातून कामगाराचा खून, चोऱ्या, सोमवारी तर बायणा वास्को येथे दिवसाढवळ्या चौघांनी तरुणाची निर्घृण हत्या केली. या प्रकरणांमुळे सामाजिक क्षेत्रामधून चिंता व्यक्त होत आहे. तर विरोधकांनीही राज्य सरकारवर आगपाखड सुरू केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.