वाळपई: स्‍ट्रॉबेरीनंतर लाल, पांढरी भेंडीची लागवड; दररोज 100 किलो उत्‍पादन

साट्रेतील श्‍‍याम गावकर याचा यशस्‍वी प्रयोग
पांढरी आणि लाल रंगाची भेंडी
पांढरी आणि लाल रंगाची भेंडीपद्माकर केळकर
Published on
Updated on

वाळपई: सत्तरी तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये साट्रे गावात गेल्या वर्षी स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला होता. आता तिथेच न थांबता पुढे जाऊन युवा शेतकरी शाम गावकर यांनी लाल व पांढऱ्या रंगांच्या भेंडीची लागवड यशस्वी करून दाखविली आहे. बाजारपेठेमध्ये वाढती मागणी व शरीराला अत्यंत सदृढ अशा उत्पादनाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात अशा प्रकारच्या लागवडीच्या माध्यमातून चांगले उत्पादन करण्याचा त्यांचा मनोदय आहे. (Walpai farmers planted red and white okra after strawberries)

नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील साट्रे येथे श्याम गावकर यांनी गतवर्षी स्ट्रॉबेरीची लागवड यशस्वी करून दाखविली होती. सत्तरी तालुक्याच्या हवामानामध्ये बऱ्याच प्रमाणात थंडपणा आहे. यामुळे साट्रेत स्ट्रॉबेरीची लागवड होऊ शकते. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी सत्तरी तालुक्यामध्ये लाल व पांढऱ्या भेंडीची निर्मिती होते का? यासंदर्भात प्रयत्न सुरू केले.

पाचशे चौ.मी. क्षेत्रात प्रयोग

सुमारे पाचशे चौ.मी जमिनीमध्ये लाल व पांढरी भेंडीची लागवड केली आली. योग्य प्रकारे निगा खत पाणी व्यवस्थापनानंतर भेंडीची झाडे जोमदारपणे वाढली आहेत. गेल्या अनेक वर्षापासून श्याम भेंडीच्या लागवड व उत्‍पादन घेण्‍यात अग्रेसर आहे. मात्र, लाल व पांढऱ्या भेंडीचे उत्पादन खरोखरच यशस्वी होऊ शकते, हे देखील सिद्ध झाले आहे. पूर्णपणे लालभडक व पांढऱ्या शुभ्र दुधाळी स्वरूपाची भेंडीची जात आहे. भेंडीचा आकार मोठा व लांब असल्यामुळे त्याला बाजारपेठेमध्ये चांगल्या प्रकारची मागणी आहे. जवळपास दोन महिन्यांपूर्वी त्यांनी या प्रकारचे लागवड केली. शंभर किलो पेक्षा जास्त भेंडीची विक्री केली आहे.

पांढरी आणि लाल रंगाची भेंडी
डिचोली: धुमासेतील शेतकऱ्यांची सामूहीकरित्या हळद लागवड

आरोग्‍यवर्धक उत्‍पादन

आरोग्यासाठी या भेंडीचा प्रकार अत्यंत लाभदायक आहे. विशेष म्हणजे हृदयविकाराची समस्या असलेल्यांसाठी, मधुमेही रुग्णांसाठी ही भेंडी अत्यंत चांगली आहे. श्‍‍याम आता स्वतः बियाणे तयार करून येणाऱ्या काळात लाल, पांढरी भेंडी लागवड करणार आहे. वाळपई विभागीय कृषी कार्यालयाच्या अधिकाऱ्याकडून त्‍याला वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com