Morjim: हॉटेलचे सांडपाणी सोडले समुद्रात! मोरजी येथील किळसवाणा प्रकार; प्लास्टिक पिशव्यांमधून टाकला कचरा

Morjim Hotel Sewage: विठ्ठलदासवाडा समुद्रकिनारी एका हॉटेल व्यवसायिकाने आपल्या चारमजली हॉटेलचे सांडपाणी पाईप घालून पारंपरिक ओहोळामध्ये सोडले आहेत. शिवाय प्लास्टिक पिशव्यांमध्ये कचरा भरून टाकला आहे.
Morjim beach
Morjim beachDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: विठ्ठलदासवाडा-मोरजी पंचायत क्षेत्रातील समुद्रकिनारी भागात सीआरझेड विभागाचे उल्लंघन करून उभारलेल्या एका हॉटेलमधील सांडपाणी पारंपरिक ओहोळाद्वारे समुद्रात सोडण्यात आले असून प्लास्टिक पिशव्यांमधून कचरा टाकण्याचा प्रकार खुलेआम सुरू आहे. त्यामुळे या हॉटेल व्यावसायिकावर कारवाई करावी, अशी मागणी मोरजीचे सरपंच पवन मोरजे आणि पंच विलास मोरजे यांनी केली.

विठ्ठलदासवाडा समुद्रकिनारी एका हॉटेल व्यवसायिकाने आपल्या चारमजली हॉटेलचे सांडपाणी पाईप घालून पारंपरिक ओहोळामध्ये सोडले आहेत. शिवाय प्लास्टिक पिशव्यांमध्ये कचरा भरून टाकला आहे. तीच घाण थेट समुद्राला मिळते.

मोरजीचे सरपंच पवन मोर्जे आणि पंच विलास मोर्जे यांनी घटनास्थळी भेट देऊन या परिसराची पाहणी केली आणि तीव्र नाराजी व्यक्त केली.

नोटिसीला पंचायत संचालकांकडून स्थगिती

सरपंच मोर्जे यांनी सांगितले, की सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून हे हॉटेल या ठिकाणी उभारले असल्याने ते हटविण्यासाठी पंचायतीने संबंधित व्यावसायिकाला नोटीस बजावली होती. परंतु पंचायत संचालकांनी त्याला स्थगिती दिली. त्यामुळे नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली असून या हॉटेलसंदर्भात आमच्याकडेही अनेक तक्रार येत आहेत.

Morjim beach
Morjim Beach: 'मोरजी किनाऱ्यावरील सुशोभीकरण थांबवा'! गोवा खंडपीठाचा आदेश; GTDC प्रकल्पाला खीळ

नियम धाब्यावर बसवून बांधलेल्या या हॉटेलला प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी कशी काय दिली, याची माहिती जनतेला द्यावी. आरोग्य खात्यानेही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

- पवन मोर्जे, सरपंच, मोरजी.

Morjim beach
Morjim: वाळूचे तेंब उद्ध्वस्त करून पार्किंग प्रकल्प नकोच! नागरिकांचा इशारा; पंचायत, आमदाराचा प्रकल्पाला पाठिंबा

हॉटेलचे सांडपाणी समुद्रात सोडण्याचा प्रकार निंदनीय असून प्रदूषण मंडळ आणि आरोग्य खात्यानेही याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे. पंचायतीने कारवाई करण्यासाठी पावले उचलली तर वरिष्ठ पातळीवरून मोठ्या प्रमाणात दबाव तंत्राचा वापर केला जातो. हे योग्य नाही.

- विलास मोर्जे, पंचसदस्य, मोरजी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com