Morjim: वाळूचे तेंब उद्ध्वस्त करून पार्किंग प्रकल्प नकोच! नागरिकांचा इशारा; पंचायत, आमदाराचा प्रकल्पाला पाठिंबा

Morjim Parking Project: टेंबवाडा समुद्रकिनारी भागात दोन हजार चौरस मीटर जागेत पर्यटन खात्याअंतर्गत बहुउद्देशीय पार्किंग प्रकल्प उभारण्याचे काम सुरू झाले आहे.
Morjim Parking Project
Morjim Parking ProjectDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी : टेंबवाडा समुद्रकिनारी भागात दोन हजार चौरस मीटर जागेत पर्यटन खात्याअंतर्गत बहुउद्देशीय पार्किंग प्रकल्प उभारण्याचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पाला सीआरझेट विभाग व पंचायतीने ना हरकत दाखला दिला आहे. मात्र सीआरझेड कायद्याचा भंग करत वाळूचे तेंब हटवून हा प्रकल्प उभारला जात आहे. त्यामुळे त्वरित हे काम बंद करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

यावेळी कॅप्टन जेराड फर्नांडिस,अल्बर्ट फर्नांडिस, विल्सन फर्नांडिस, रिचर्ड फर्नांडिस तसेच पार्सेचे माजी सरपंच देवेंद्र प्रभुदेसाई आदि उपस्थित होते.

रिचर्ड फर्नांडिस यांनी सीआरझेड विभागाने फेरविचार करून दिलेले परवाने त्वरित मागे घ्यावेत. सीआरझेट विभाग किनाऱ्याचा संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असताना वाळूचे तेंब हटवून प्रकल्प उभारण्यास परवानगी कशी काय देते, असा प्रश्‍न उपस्थित केला.

Morjim Parking Project
Morjim: हॉटेलचे रशियन फलक हटवा, गावात 25 मीटरचे रस्ते नकोत; मोरजी ग्रामसभेत ग्रामस्थांची मागणी

दरम्यान, सरपंच पवन मोर्जे यांच्याकडे संपर्क साधला असता पार्किंग प्रकल्पासाठी संबंधित विभागाकडून परवाने मिळाल्यानंतर पंचायतीनेही ना हरकत दाखला दिल्याचे मोर्जे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Morjim Parking Project
Morjim Goa: पुणेकर पर्यटकांना गोव्यातील क्लबमध्ये लाथाबुक्यांनी मारहाण? एन्ट्री पासवरुन हमरीतुमरी, परस्परविरोधी गुन्हा

कायद्यानुसारच प्रकल्प; आरोलकर

आमदार जीत आरोलकर यांच्याकडे संपर्क साधला असता पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्याने या प्रकल्पाची अत्यंत गरज आहे. पार्किंगची व्यवस्था, चेंजिंग रूम, शौचालय आधी सुविधा येथे उपलब्ध असणार आहेत. सर्व प्रकारचे परवाने घेऊनच या प्रकल्पाला चालना दिली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com