गोव्यात खासगी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा विश्वजित राणेंचा मानस

विश्वजित राणे यांनी शुक्रवारी आरोग्य विभागाचे अधिकारी आणि आरोग्य सेवा संचालनालयाच्या उच्च अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
Vishwajit Rane
Vishwajit Rane Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्यात खासगी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा मानस आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवला आहे. “मी पक्षाच्या (भाजप) बैठकीत चर्चा केली आहे; गोव्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करता येईल. ही चर्चा सध्या प्राथमिक टप्प्यात आहे," असे राणे म्हणाले. (Vishwajit Rane wants to build new medical college in Goa)

Vishwajit Rane
जामिनावर सुटल्यानंतर 3 दिवसात परत गजाआड; म्हापसा पोलिसांची कारवाई

पणजी येथे विश्वजित राणे यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी आणि आरोग्य सेवा संचालनालयाच्या उच्च अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी राणे म्हणाले, "काही आरोग्य सेवा आणि प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलवर कार्यान्वित केले जाऊ शकतात."

Vishwajit Rane
वाढत्या कच्च्या तेलाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलचे गोव्यातील नवीन दर जारी

शुक्रवारी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत राणे यांनी एसटी-एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फेक्शन (STEMI) गोवा प्रकल्प राज्यातील दुर्गम भागात नेण्याच्या शक्यतेवर चर्चा केली. हृदयविकार असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी STEMI वरदान ठरले आहे. उपआरोग्य केंद्र स्तरावर डॉक्टरांच्या कमतरतेवर भाष्य करताना राणे म्हणाले की, जे डॉक्टर सेवा बाँडवर आहेत त्यांच्या सेवा वापरण्याचा विभाग विचार करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com