Vishwajit Rane
Vishwajit Rane Dainik Gomantak

लोकांना लुबाडणाऱ्यांना कायद्याने सोडणार नाही

मंत्री विश्वजीत राणेंचा मायकल लोबोंवर पुन्हा एकदा निशाणा
Published on

म्हापसा : टीसीपीच्या उल्लंघनकर्त्यांवर कायद्यानुसार कारवाई होत आहे. ज्यांच्या खिशात शंभर रुपये नव्हते ते आज लोकांना ओरबाडून गडगंज श्रीमंत झाले आहेत, अशा शब्दांत नगर नियोजन मंत्री विश्‍वजीत राणे यांनी विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यावर हल्लाबोल केला.

शुक्रवारी म्हापसा येथे भाजपच्या एका कार्यक्रमानंतर राणेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘केवळ मायकल लोबोंचा एकमेव विषय माझ्या जीवनात नाही. एखादी व्यक्ती चुकीचे कर्म करते म्हणून मी काही त्यांच्या मागे हात धुवून पाठिमागे लागणारा माणूस नाही. मला गोव्याची चिंता आहे. बेकायदा गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचे काम माझे आहे’.

Vishwajit Rane
गोव्यात रस्ते अपघात 16 टक्क्यांनी वाढले

मिकावरही कारवाई

मंत्री असताना कुणी कशाप्रकारे अधिकाऱ्यांवर प्रभाव टाकण्याचा प्रकार केला होता. तसे त्याठिकाणी लिखित स्वरूपात आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास गायक मिका सिंग असो किंवा इतर कुणीही, त्यांच्यावर कारवाई होणारच, असे स्पष्ट संकेत मंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com