Goa: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राणेंनी घेतली बैठक! डेंग्यू, मलेरिया नियंत्रणासाठी घेतला आढावा

Vishwajit Rane: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात बैठक घेऊन विविध विभागांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला.
Vishwajit Rane
Vishwajit RaneDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डासांच्या वाढीस पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे डेंग्यूसह इतर आजारांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात बैठक घेऊन विविध विभागांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला. बैठकीत आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, गोमेकॉचे तज्ज्ञ व विभाग प्रमुख सहभागी होते.

यावेळी प्रत्येक विभागासमोरी ल अडचणी, सध्याची सुविधा यांचा सखोल आढावा घेण्यात आला. मंत्री राणे यांनी सांगितले की, राज्यातील जनतेला दर्जेदार व तत्काळ आरोग्यसेवा मिळावी यासाठी आम्ही एक व्यापक कृती आराखडा तयार करत आहोत.

सद्य:स्थितीत वेक्टर-जन्य आजारांवर नियंत्रणासाठी अधिक सजग व प्रतिसादक्षम यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे. यासाठी प्रत्येक विभाग प्रमुखाशी स्वतंत्रपणे बैठक घेऊन त्यांच्या विभागातील कमतरता समजून घेण्यात येईल.

Vishwajit Rane
Cutbona Jetty: 'कुटबण' घेणार मोकळा श्वास! कॉलराची साथ जवळपास संपल्‍यात जमा; जेटी पूर्णपणे स्‍वच्‍छ करणार

गोवा निवासी डॉक्टर्स संघटनेने मानधनवाढीची केलेली मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मांडणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. संघटनेच्या प्रतिनिधींनी आज आरोग्यमंत्री गोमेकॉत आले असताना त्यांची भेट घेऊन ही मागणी केली होती.

Vishwajit Rane
Dengue In Goa: मडगावात खळबळ! पालिकेच्‍या सुरक्षारक्षकांनाच डेंग्‍यूची लागण

यावेळी आरोग्यमंत्र्यांनी त्यांची मागणी योग्य असून ती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे लवकरच मांडण्यात येईल, असे सांगितले. तसेच राज्यातील आरोग्य यंत्रणेचा कणा म्हणून निवासी डॉक्टर महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या या समर्पणाला दाद देत, त्यांचे हित जपले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com