Hindu Protest: अत्याचाराविरोधात जागे व्हा! विश्र्व हिंदू परिषदेच्या आमशेकर यांचे प्रतिपादन

Vishva Hindu Parishad: लोहिया मैदानावरुन उपस्थित सर्वांनी मोर्चा काढला व नगरपालिका, बागेला वळसा घालून परत लोहिया मैदानावर येऊन सभेला प्रारंभ झाला
Vishva Hindu Parishad: लोहिया मैदानावरुन उपस्थित सर्वांनी मोर्चा काढला व नगरपालिका, बागेला वळसा घालून परत लोहिया मैदानावर येऊन सभेला प्रारंभ झाला
Vishva Hindu Parishad Hindu ProtestDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: भारतीयांनी धर्मांतर व राष्ट्रांतराचा अनुभव घेतलेला आहे. आता बांगलादेशात हिंदू समाजावर अत्याचार सुरू आहेत. त्याविरोधात सर्व हिंदूंनी एकसंघ होण्याबरोबरच जागृत होण्याची अत्यंत गरज आहे,असे प्रतिपादन विश्र्व हिंदू परिषदेच्या मोहन आमशेकर यांनी केले.

सर्वप्रथम लोहिया मैदानावरुन उपस्थित सर्वांनी मोर्चा काढला व नगरपालिका, बागेला वळसा घालून परत लोहिया मैदानावर येऊन सभेला प्रारंभ झाला.

लोहिया मैदानावर हिंदू एकता मंचने आयोजित केलेल्या सभेत आमशेकर बोलत होते.सर्व हिंदूनी प्रांत, जाती, भाषा, पंथ भेद विसरून एकसंघ होणे गरजेचे आहे,असेही त्यांनी सांगितले. हिंदूंएवढा सहिष्णू समाज जगात दुसरा नाही. हा देशाचा स्वाभिमानी समाज आहे. हिंदू भ्याड कधीही नव्हते व होणारही नाहीत. त्याच साठी हिंदूनी त्यांच्यावर झालेले अत्त्याचार सोसले व त्याच बरोबर त्या अत्याचाऱ्यांना प्रत्युत्तरही दिले.

केंद्र सरकारने देशात काही चांगले निर्णय घेऊन अखंड भारताच्या दिशेने पाऊल उचलले आहे. गेल्या ७० वर्षांत देशात हिंदूचे खच्चीकरण झाले. त्यासाठी वक्फ बोर्डाची पुनर्रचना करणे, ३७०वे कलम रद्द करणे हितावह ठरत असल्याचे आमशेकर यांनी सांगितले. देशात जी बेकायदेशीर धंदे, व्यापार चालू आहेत, ते बंद करण्यासाठी सरकारने कायदा अंमलात आणणे गरजेचे आहे. गोव्यातही गैरधंदे, व्यापार चालू आहेत. पंचायत, नगरपालिकांनी त्यासाठी कठोर पावले उचलणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार उल्हास तुयेकर म्हणाले,की भारतात सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने राहतात. मुसलमान समाज सुद्धा देशात सुरक्षित आहे. केंद्र सरकारने या सभेची गंभीर दखल घेऊन बांगलादेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत. यावेळी मोठ्या संख्येने विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते.

Vishva Hindu Parishad: लोहिया मैदानावरुन उपस्थित सर्वांनी मोर्चा काढला व नगरपालिका, बागेला वळसा घालून परत लोहिया मैदानावर येऊन सभेला प्रारंभ झाला
Hindu Protest: बांगलादेशातील हिंदू धर्मीयांवरील अत्याचाराच्या विरोधात गोव्यात भव्य निषेध यात्रा

बांगलादेश सरकारवर दबाव टाकावा!

मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले की, बांगलादेशात हिंदूवर जो अत्याचार सुरू आहे, त्याचा देशावरही परिणाम होत आहे. बांगलादेशप्रमाणे भारतातही अशा घटना होतील, अशा प्रवृत्ती देशात आहेत. पण ते आम्हाला मान्य नसल्याचे फळदेसाई यांनी सांगितले. भारतात अल्पसंख्याक सुखासमाधानाने जगतात. त्याच प्रमाणे बांगलादेशातही अल्पसंख्यांकानी सुखाने जगावे, तेथील मंदिरे, हिंदूची घरे सांभाळण्यासाठी भारताने त्या देशाच्या सरकारवर दबाव टाकावा, असे आपले प्रामाणिक मत असल्याचेही फळदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com