Goa News: पडोसेत घरावर वीज पडल्याने मोठे नुकसान; पित्रा-पुत्र बचावले

Padose: वीज पडली त्यावेळी घरातील विष्णू व त्यांचे पुत्र संजय आणि लक्ष्मी या काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यामुळे या घटनेतून ते बचावले.
Vishnu Gawkars house in Padose suffered major damage due to lightning
Vishnu Gawkars house in Padose suffered major damage due to lightningDainik Gomantak

Goa News: साखळी ता. २१ (प्रतिनिधी) : मधलावाडा, पडोसे सत्तरी येथे विष्णू गावकर यांच्या घरावर सोमवारी (ता.२०) संध्याकाळी ४ वा. वीज कोसळल्याने घराचे पत्रे फुटले, भिंतीला तडे गेले. घरातील वीज केबल जळून खाक झाल्या. वीज पडली त्यावेळी घरातील विष्णू व त्यांचे पुत्र संजय आणि लक्ष्मी या काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यामुळे या घटनेतून ते बचावले.

सोमवारी संध्याकाळी अचानक पावसाला सुरुवात झाली. सोबत वारा व विजेचा गडगडाट सुरू होता. याचवेळी यांच्या घरावर वीज कोसळली. कानठळ्या बसणारा आवाज झाला. नेमके यावेळी विष्णू व पूत्र संजय हे घराबाहेरच्या झोपडीवर प्लास्टिक घालत होते. विष्णू हे छपरावर होते, तर संजय साहित्य वर देत होता. यात भिंतीचा भाग तुटून पडला. आतील सर्व विद्यूत वाहिन्या जळून खाक झाल्या. पर्ये तलाठ्यांनी घराची पाहणी केली.

Vishnu Gawkars house in Padose suffered major damage due to lightning
Goa News: '...तर पाणी पुरवठा बंद करू' जमावाच्या इशाऱ्यानंतर फोंडा पोलिसांकडून मारहाण प्रकरणी रितसर कारवाई

अन् जीवरक्षक वाचला

काणकोण पाळोळे येथे दृष्टीच्या जीवरक्षक बसलेल्या प्लास्टीक खूर्चीवर वीज पडून खूर्ची जळाली मात्र जीवरक्षक बालंबाल बचावला. काल संध्याकाळी विजेच्या गडगडाटासह पडलेल्या पावसामुळे पाळोळे येथे दृष्टीच्या जीवरक्षक बसलेल्या प्लास्टीक खूर्चीवर वीज पडून खूर्ची जळाली. मात्र जीवरक्षक बालंबाल बचावला. त्याला काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र त्याला कोणतीच इजा झाली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com