Viriato Fernandes: ''26 वर्षे मी देशाची सेवा केली, संविधानाच्या आदराबाबत भ्रष्ट राजकारण्याने शिकवू नये''; कॅ. विरियातो यांचा घणाघात

Goa Loksabha Election 2024: मी फौजी आहे. मी २६ वर्षे देशाची सेवा केली आहे. त्‍यामुळे संविधानाचे महत्त्व काय, हे मला कुणी भ्रष्‍ट राजकारण्‍याने शिकवण्याची गरज नाही.
Viriato Fernandes
Viriato FernandesDainik Gomantak

Goa Loksabha Election 2024: मी फौजी आहे. मी २६ वर्षे देशाची सेवा केली आहे. त्‍यामुळे संविधानाचे महत्त्व काय, हे मला कुणी भ्रष्‍ट राजकारण्‍याने शिकवण्याची गरज नाही. त्‍या सभेत मी काय बोललो, याचा व्‍हिडिओ आहे. यावर जर मुख्‍यमंत्र्यांना खुली चर्चा करायची असेल, तर त्‍यांनी वेळ आणि जागा ठरवावी. मी तेथे येण्‍यास तयार आहे, असे खुले आव्‍हान काँग्रेसचे उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी दिले.

मडगावातील पत्रकार परिषदेत विरियातो म्हणाले की, ज्‍यांनी संविधानाशी प्रतारणा करून बेकायदेशीर पक्षांतर केले आणि देवाची खोटी शपथ घेतली, ते दिगंबर कामत माझ्‍या विरोधात तक्रार करतात, यापेक्षा मोठा विनोद नाही. मी संविधान आणि लोकशाही यांचा पूर्ण आदर करणारा शिपाई आहे. मी संविधानाच्‍या विरोधात कोणतेही आक्षेपार्ह वक्‍तव्‍य केलेले नाही. माझ्‍या भाषणातील काही निवडक शब्द फिरवून भाजप लोकांमध्‍ये गैरसमज पसरवू पाहतो आहे, अशी प्रतिक्रिया कॅ. फर्नांडिस यांनी व्‍यक्‍त केली.

Viriato Fernandes
Goa Loksabha Election 2024: एकाचीही माघार नाही, गोव्यात 16 उमेदवार रिंगणात; सहाजणांत मुख्य लढत

भाजपचे आमदार दिगंबर कामत, दामू नाईक आणि इतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरियातो यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच, विरियातो यांनी भारतीय संविधानाचा अपमान केल्याचा आरोप नाईक यांनी केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. विरियातो यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र करावे, अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली. दुहेरी नागरिकत्वाचे समर्थक असणारे विरियातो फर्नांडिस यांनी राहुल गांधी यांना 2019 मध्ये हा विषय समजावून सांगताना गोव्यात संविधान लादल्याची फर्नांडिस म्हणाले.

Viriato Fernandes
Goa Loksabha Election 2024 Dates: गोव्यात कधी होणार लोकसभेसाठी मतदान? जाणून घ्या निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक

विरियातो यांच्या वक्तव्यावरुन सध्या राज्यात वांदग निर्माण झाला असून, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काँग्रेस लोकशाहीला धोका असल्याचे मत मांडले. तसेच, काँग्रेसमुळेच गोव्याला 14 वर्षे उशीरा स्वातंत्र्य मिळाले असा आरोप केला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या वक्तव्याची दखल घेतली असून, विरियोतोंचे वक्तव्य म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान असल्याची टीका पंतप्रधान मोदींना छत्तीसगड येथील प्रचारसभेत केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com