Viral Video: 'मनोहर पर्रीकर फिरायचे तसे तुम्हीही फिरत जा'; पुण्यात पाहणी दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना महिलेचा सल्ला Watch Video

Ajit Pawar Pune viral video: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एका स्थानिक महिलेने वाहतुकीच्या समस्येवरून एक खास सल्ला दिल्याचा प्रकार
Deputy CM Ajit Pawar news
Deputy CM Ajit Pawar newsDainik Gomantak
Published on
Updated on

Pune woman advice to Ajit Pawar: पुणे शहराच्या दौऱ्यावर असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एका स्थानिक महिलेने वाहतुकीच्या समस्येवरून एक खास सल्ला दिल्याचा एक प्रकार समोर आला आहे. महिलेने थेट वाहतुकीच्या मुद्द्यावर प्रश्न विचारत गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे उदाहरण दिले. मात्र, पर्रिकरांचे नाव ऐकताच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सध्या बराच व्हायरल होतोय.

'तुम्ही पण कधीतरी माहिती न देता फिरा...'

पुण्यात वाहतुकीची समस्या मांडत महिलेने अजित पवारांना एक सल्ला दिला. त्या म्हणाल्या, "मनोहर पर्रिकर जसे वाहतूक व्यवस्था पाहण्यासाठी फिरत असत, तसेच तुम्ही पण फिरा. मात्र, तुम्ही येण्याआधी माहिती न देता अचानक या, म्हणजे तुम्हाला खरी परिस्थिती कळेल." महिलेने पुढे सांगितले की, "तुम्ही प्रश्न विचारणार आणि आम्ही उत्तर देणार हा या समस्येवर उपाय नाही." त्यांनी शहरातील अमनोरा रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीबद्दलही तक्रार केली.

Deputy CM Ajit Pawar news
Viral video: चालत्या कारच्या छतावर चढले अन्… तरुणांचा धोकादायक स्टंट व्हायरल; व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

'मला काम करू द्या'

यावेळी महिलेने मनोहर पर्रिकरांचे नाव घेतल्यावर अजित पवारांनी चकित होऊन तातडीने विचारले, "पर्रिकर कोण?" यावर महिलेने, "गोव्याचे मंत्री," असे स्पष्टीकरण दिले. यानंतर, महिलेने दिलेल्या तक्रारीवर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली.

त्यांनी म्हटले, "मला मान्य आहे माझ्याकडून चूक झाली, मात्र मला तुम्हाला सांगायचे आहे की मी काम करायला आलो आहे, त्यामुळे मला काम करू द्या." महिला नागरिकाने मांडलेल्या समस्येवर अजित पवारांनी दिलेल्या या उत्तराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com