Viral Video: गोव्यातील 'Night Clubमध्ये' भारतीयांना डावलून विदेशी लोकांना पसंती; स्कॉटिश माणसाची पोस्ट व्हायरल

Goa Night Club Viral Video: या व्हिडीओच्या माध्यमातून गोव्यातील नाईट क्लब्समध्ये भारतीय पर्यटकांना डावलून विदेशी पर्यटकांना प्राधान्य दिलं जातंय असं म्हटलं गेलंय
night club controversy goa
night club controversy goaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Night Clubs: सध्या इंस्टाग्रामवर गोव्यातील एक व्हिडीओ बराच व्हायरल होतोय. हा व्हिडीओ स्कॉटलंडमधील काही लोकांनी पोस्ट केलाय. तर या व्हिडीओच्या माध्यमातून गोव्यातील नाईट क्लब्समध्ये भारतीय पर्यटकांना डावलून विदेशी पर्यटकांना प्राधान्य दिलं जातंय असं म्हटलं गेलंय. रॉबिन अल्डरस्लो आणि रायन विल्यम्स यांनी गोव्यातील नाईट क्लब्सना वर्णद्वेषी नाईट क्लब असं म्हटलंय.

रॉबिन अल्डरस्लो, एक स्कॉटिश बॅगपायपर आणि चित्रपट निर्माते आहेत आणि त्यांनी गोव्यातील अनुभव मांडताना हा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये भारतीय पर्यटक नाईट क्लबमध्ये जाणण्यासाठी रांगेत उभे आहेत आणि त्यांना मागे टाकत परदेशी पर्यटक पुढे जाताना दिसतायत. अल्डरस्लो म्हणतायत की फक्त विदेशी असल्यामुळे त्यांना विनामूल्य प्रवेश दिला जातोय मात्र भारतीय असल्याने त्यांना मागे ठेवलं जातंय.

हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला आणि त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. इंस्टाग्रामवर फिरणाऱ्या या व्हिडीओमध्ये सध्या परदेशी आणि स्थानिकांना गोव्यातील नाईट क्लब्समध्ये कशी वागणूक दिली जाते याबद्दल व्यापक संभाषण सुरू केले आहे.

night club controversy goa
Goa Tourism: असले पर्यटक नकोच! महाराष्ट्रातून आलेले पर्यटक- हॉटेलच्या सुरक्षारक्षकांमध्ये हाणामारी, डोक्यात घातला दगड; Video

अनेक वापरकर्त्यांनी या कथित भेदभावावर संताप व्यक्त केला. एका वापरकर्त्याने प्रश्न केला की, "जगात कुठेही लोक आपल्याच देशवासियांशी भेदभाव करतात का की फक्त भारतच असं घडत आहे?" "आशियाई लोकांना स्थानिकांपेक्षा परदेशी लोकांशी चांगले वागणे आवडते." असं दुसरा म्हणाला आहे.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर इंस्टाग्रामवर एका गोवेकराने देखील प्रतिक्रिया नोंदवली आहे, तो म्हणतो की, "परदेशी लोकंच्या वागणुकीवरून आम्ही त्यांच्याशी कसं वागावं हे ठरवतो, भारतीय जेव्हा थोडी जास्ती पैसे खर्च करतात तेव्हा त्यांना ते वाटेल ते करू शकतात असं वाटतं."

आणखीन एका नेटकाऱ्याने म्हटलं आहे की " काही देशी पर्यटक गोव्यात येऊनशिष्टाचार दाखवत नाहीत ते समुद्रकिनार्यावर कचरा टाकतात, दारू पिऊन गाडी चालवतात, गुन्हे घडतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com