Social Media Outrage
Social Media OutrageDainik Gomantak

Goa Viral Post: समाजमाध्यमावर गोव्याची बदनामी; कारवाई करण्याची मागणी

@clearlytripping Instagram viral Post Goa: क्लियरलिट्रिपिंग नावाच्या एका इंस्टाग्राम चॅनेलवर गोव्याच्या संदर्भात नकारात्मक आणि चुकीची माहिती पसरवून पर्यटकांना गोव्याच्या ऐवजी इतर राज्यांमध्ये जाण्याचे आवाहन केले जात आहे.
Published on

पणजी: क्लियरलिट्रिपिंग नावाच्या एका इंस्टाग्राम चॅनेलवर गोव्याच्या संदर्भात नकारात्मक आणि चुकीची माहिती पसरवून पर्यटकांना गोव्याच्या ऐवजी इतर राज्यांमध्ये जाण्याचे आवाहन केले जात आहे. या चॅनेलवर ‘गोवा अस्वच्छ आहे, महाग आहे आणि येथे जाण्यापेक्षा इतर ठिकाणांना भेट द्या’ असा प्रचार केला जात आहे, ज्यामुळे गोव्यातील पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या प्रकरणावर पर्यटन भागीदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारे सोशल मीडियावर गोव्याची बदनामी करणाऱ्या चॅनेलविरुद्ध तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सरकारकडे केली जात आहे. गोवा सरकारने यापूर्वी समाज माध्यमांवर गोव्याची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र, या चॅनेलच्या प्रचारावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असे दिसून येते. जर ही परिस्थिती अशीच कायम राहिली, तर नवीन वर्षात पर्यटकांच्या संख्येत आणखी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Social Media Outrage
Goa Tourism: पर्यटकांनी खरचं गोव्याकडे पाठ फिरवलीय का, सरकारी आकडेवारी काय सांगते? वाचा

गोव्याचे पर्यटन व्यवसाय राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे अशा नकारात्मक प्रचारामुळे राज्याच्या प्रतिमेला हानी पोहोचू शकते. यासाठी सरकारने तातडीने या प्रकाराची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विविध पर्यटन संघटनांनी केली आहे.

गोव्याची अशी बदनामी सोशल माध्यमांवर झाली तर अजूनच पर्यटक घटेल अशी खंत व्यक्त केली जात आहे. अशा चॅनेलवर कारवाई करण्याबरोबरच सरकारने रस्ते व पायाभूत सुविधांवर अजून भर देण्याची गरज देखील संघटनांनी व्यक्त केली आहे.

गोवा का निवडावा?

१गोवा हे देश-विदेशातील पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. सध्या नवीन वर्षाच्या उत्सवाच्या निमित्ताने गोव्यामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

२ किनारे, किल्ले, ऐतिहासिक स्थळे आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आनंद घेण्यासाठी देशाच्या विविध भागातून तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी गोव्याचा रस्ता धरला आहे.

३ गोवा सरकारच्या पुढाकारामुळे सणासुदीच्या हंगामात पर्यटकांना सुविधा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यात आल्या आहेत. पोलीस, पर्यटन विभाग आणि स्थानिक प्रशासन पर्यटकांसाठी सतत कार्यरत आहेत.

४. यंदा नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्याच्या प्रसिद्ध किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. पर्यटनासाठी सर्वोत्तम ठिकाण बनण्याबरोबरच गोवा आरोग्य सेवा, स्वच्छता आणि शाश्वत पर्यटनाच्या दिशेनेही प्रगती करत आहे. या दोन क्षेत्रांचा उत्तम समन्वय गोव्याला जागतिक पातळीवर ओळख मिळवून देत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com