Vinita Shirodkar: मोरजी येथील मूक बधिर विनिता शिरोडकर हिने 2023 चा पहिला ‘मिस डेफ इंडिया’ हा किताब पटकावल्यानंतर आता ती ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे. आफ्रिकेत होत असलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी ती गुरूवारी(दि.17) आफ्रिकेला रवाना झाली.
विनिताने 2023 चा ‘मिस इंडिया’ हा किताब प्राप्त केल्यानंतर तिचा आत्मविश्वास वाढला. आपणही काहीतरी करू शकतो, समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो, त्या जाणिवेने तिने एकेक पाऊल पुढे टाकत 19 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया येथे होणाऱ्या वर्ल्ड डेफ स्पर्धत विनिता भारताचे नेतृत्व करणार आहे.
विनिता जन्मतःच मूकबधिर असल्याचे तिच्या पालकांना समजले. त्यामुळे त्यांना चिंता सतावू लागली. एकीकडे मूकबधिरपण असले तरीही तिला बुद्धिमत्तेचे वरदान असून देखणी विनिता अभ्यासातही हुशार आहे. विशेष मुलांसाठीच्या संजय उच्च माध्यमिक विद्यालयातून तिने बारावीत ७६ टक्के गुण मिळवले होते. विनिताला नृत्याची आणि चित्रकलेची आवड आहे. तिला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायलाही आवडते.
मान्यवरांकडून शुभेच्छा ः विनिताच्या यशाबद्दल मोरजीवासीय आणि स्थानिक आमदार जीत आरोलकर, सरपंच मुकेश गडेकर, जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर आदींनी शुभेच्छा दिल्या. ती नक्कीच विजेती होऊन गोव्यात परतेल, असा विश्वासही मान्यवरांनी व्यक्त केला.
विनिताच्या आईचाही संघर्ष
विनिताचे वडील वारल्यावर मुलांची सगळी जबाबदारी आईवर आली. आजही उदरनिर्वाहासाठी विनिताची आई मोरजीत ऑम्लेट-चिकन, पाव भाजीचा गाडा चालवून संसारासह मुलांच्या शिक्षणाचा खर्चही भागवत आहे. आपल्या मुलांना शिक्षण देण्याचा तिचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. मुलगी भारताचे नेतृत्व करण्यासाठी आफ्रिकेत जात असल्याबद्दल ती खूप आनंदीत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.