Vimala Pai Award : माणिकराव गावणेकर यांना जीवनगौरव तर जयंती नाईक यांना साहित्य पुरस्कार

कवितेसाठीचा पुरस्कार वल्ली क्वाद्रोस यांना जाहीर
Vimala Pai Award :
Vimala Pai Award : Dainik Gomantak
Published on
Updated on

Vimala Pai Award : मंगळूर येथील कोंकणी भाषा आणि संस्कृती प्रतिष्ठान तर्फे दिले जाणारे विमला व्ही. पै विश्व कोकणी पुरस्कार जाहीर करण्यात आले असून गोव्यातील ज्येष्ठ साहित्यिक माणिकराव गावणेकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Vimala Pai Award :
Goa Cashew Feni : विमानतळांवर मिळणार ड्युटी-फ्री 'गोव्याची फेणी'; प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन

गद्य साहित्यासाठी देण्यात येणारा साहित्यीक पुरस्कार गोव्यातील प्रसिद्ध लेखिका जयंती नाईक यांच्या 'तिची काणी' या पुस्तकाला तर पद्य साहित्यासाठी देण्यात येणारा पुरस्कार मंगळूरी कवी वल्ली क्वाद्रोस यांच्या 'भितरलो कवी' या काव्य संग्रहाला जाहीर करण्यात आला.

दरम्यान, हे तिन्ही पुरस्कार 1 लाख रूपये रोख व मानचिन्ह या स्वरूपातील असून 9 फेब्रुवारी रोजी मंगळूर येथील विश्व कोकणी केंद्रात आयोजित केल्या जाणाऱ्या वार्षिक समारंभात ते प्रदान केले जाणार आहेत. टी. व्ही. मोहनदास पै यांनी आपली आई विमला पै यांच्या नावे हे पुरस्कार पुरस्कृत केल्याची माहिती केंद्राचे अध्यक्ष नंदगोपाल शणै यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com