No Water Supply For Two Days In Panaji And Taleigao
No Water Supply For Two Days In Panaji And TaleigaoDainik Gomantak

Water Pollution: रगाडा नदीचे नको, टँकरद्वारे शुद्ध पेयजल द्या!

Water Pollution: साकोर्डावासी कडाडले : नदी प्रदूषित; तीन दिवसांची मुदत, अन्यथा आंदोलन
Published on

Water Pollution: साकोर्डा भागातून वाहणाऱ्या रगाडा नदीचे पाणी प्रदूषित झाले असून ते पिण्यासाठी योग्य नाही. त्यामुळे टँकरने शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी साकोर्डावासीयांनी केली होती. मात्र, अद्याप गावात पाण्याचा टँकर न आल्याने साकोर्डावासीयांत पुन्हा संतापाची लाट उसळली.

आज येथील पंचायत मैदानावर या विषयावरून लोक एकवटले. त्याचे रूपांतर नंतर जाहीर सभेत झाले. या सभेचे नेतृत्व विपीन सावंत यांनी केले. सभेत सावंत यांनी नागरिकांशी चर्चा करून पुढील कृती निश्चित करण्याविषयी सर्वानुमते निर्णय घेतला.

प्रदूषित नदीतील पाण्याचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. शिवाय या विषयावर खास ग्रामसभाही बोलाविण्यात येणार आहे. गावात गेले अनेक दिवस पाण्याचा टँकर आलेला नाही.

No Water Supply For Two Days In Panaji And Taleigao
Goan Special Recipe: तिखट आणि मसालेदार गोवन स्टाईल कच्च्या कैरीचे लोणचे; जाणून घ्या सोपी रेसिपी

नदीचे पाणी दूषित झाल्याने कोणत्याही परिस्थितीत नळाचे पाणी वापरायचे नाही. गावात शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी ग्रामस्थांची आग्रहाची मागणी आहे.

आज निवेदन देणार

रगाडा नदीचे पाणी प्रदूषित झाल्याने साकोर्डा गावातील सर्व पंप हाऊस बंद करून टँकरने पाणीपुरवठा करावा, यासाठी आज (ता.२६) रोजी सकाळी पंचायतीला निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी पंचायतीला तीन दिवसांची मुदत देण्यात येईल. अन्यथा धरणे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

No Water Supply For Two Days In Panaji And Taleigao
Goa School: सहा वर्षे पूर्ण असतील, तरच पहिलीत प्रवेश

अधिकाऱ्यांना आश्‍वासनाचा विसर

यापूर्वी साकोर्डावासीयांनी पंचायतीवर धडक दिली होती. त्यानंतर प्रदूषित नदीची पंचायत मंडळाने पाहणी केली होती. त्यावेळी साबांखाचे धारबांदोडा येथील कनिष्ठ अभियंतेही आले होते. टँकरने पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्‍वासन त्यांनी त्यावेळी साकोर्डावासीयांना दिले होते. मात्र, त्या आश्‍वासनाची पूर्तता झालेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com