Carambolim Lake: हाय सायबा! करमळीच्या तलावावर 200 पेक्षा जास्त मगरी? स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

Carambolim Lake Crocodiles: म्हशीचा मृतदेह सापडल्यामुळे स्थानिकांच्या मनात खळबळ
Carambolim Lake Goa
Carambolim Lake GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Carambolim,Goa

करमाळी: गोव्यातील प्रसिद्ध करमळी तलावात एका म्हशीचा मृतदेह सापडल्यामुळे स्थानिकांच्या मनात खळबळ उडाली आहे. करमळी गावात मध्यभागी असलेला हा तलाव पावसात आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतो.

मात्र आता म्हशीसारख्या मोठ्या प्राण्याचा मृत्यू झाल्यामुळे तलावातील मगरींबद्दल भीती निर्माण झाली असून अनेकांनी या मगरींबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या दाव्यानुसार या तलावात अनेक मगरींचा संचार असतो. मगरींचा आकडा 200 किंवा त्याहूनही अधिक असण्याची शक्यता दर्शवली जातेय.

मगरींकडून कोणत्याही मनावर हल्ला केल्याची नोंद नसली तरीही पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या जीवावर हल्ला झाल्याने मानवी जीवाला या मगरी धोका नाहीत ना असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संपूर्ण घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून याचा आढावा घेतला जाईल, मात्र सार्वजनिक सुरक्षितता निश्चित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी वेळेत पाऊलं उचलणं आवश्यक आहे.

Carambolim Lake Goa
Mormugao Port: 'खासगीकरणामुळे अनेक समस्या'; मुरगाव शिष्टमंडळाचे केंद्रीयमंत्री सोनोवाल यांना निवेदन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com