विजय सरदेसाई यांचे संडे डायलॉग्स 26 जूनपासून पुन्हा सुरू!

विजय सरदेसाई यांनी यापूर्वी या उपक्रमात सरकारी अधिकाऱ्यांना लोकांपर्यंत नेऊन लोकांशी त्यांच्या कामाविषयी थेट संवाद साधला होता.
Vijay sardesai
Vijay sardesaiDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: लोकांना हवा तसा विकास ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सुरू केलेले आणि फातोर्डा मतदारसंघात तुफान लोकप्रिय झालेले 'संडे डायलॉग्स' आता 26 जून पासून पुनः सुरू होणार आहे.

(Vijay Sardesai's Sunday dialogues resume from 26th June)

Vijay sardesai
सांजाव साजरा करताना एकाला जलसमाधी!

विजय सरदेसाई यांनी यापूर्वी या उपक्रमात सरकारी अधिकाऱ्यांना लोकांपर्यंत नेऊन लोकांशी त्यांच्या कामाविषयी थेट संवाद साधला होता. या संवादात लोक आपल्या अडचणी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडत असत.

सरदेसाई यांनी सरकारी अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात यापूर्वी अशा थेट संवादाद्वारे लोकांच्या समस्यावर त्वरित तोडगे कसे निघत होते त्याची तुम्हाला जाणीव असून आता तोच उपक्रम परत सुरू करत असल्याचे म्हटले आहे.

आपल्या या उपक्रमाला सरकारी अधिकाऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळेल अशी अपेक्षा सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे. लोकांची कामे त्वरित व्हावीत यासाठी संबधित अधिकाऱ्यांनी आपली रविवारची सकाळ लोकांबरोबर घालवून लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करावेत असे आवाहन सरदेसाई यांनी सरकारी अधिकाऱ्यांना केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa SIR Voter List Case
Goa Ujjwala Scheme Latest News
Goa Stray Dogs Sterilization
Goa Aggressive Dog Breeds Ban
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com