विजय सरदेसाई
विजय सरदेसाईDainik Gomatak

Goa Politics: 'नोकरभरती आयोगावर निवृत्त न्यायाधीश नेमा' विजय सरदेसाई यांची मागणी!

...अन्यथा आयोग सरकारच्या हातातील बाहुले!

मडगाव: यापुढे नोकर भरती आयोगाच्या माध्यमातून केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे, तिचे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी स्वागत केले आहे. मात्र आयोग स्वतंत्र असावा आणि त्याच्या अध्यक्षपदी गोव्यातील उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

(Vijay Sardesai's demand to appoint a retired judge on recruitment commission in goa)

 विजय सरदेसाई
Goa Farming: गोव्यात भात बियाण्यांची बँक; तब्बल 161 जातींचे संवर्धन

हा आयोग निवळ फार्स ठरू नये आणि त्याचा अध्यक्ष सरकारच्या हातातील बाहुले ठरू नये, अशी अपेक्षा सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठीच या आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाही नोकरशहा किंवा अधिकाऱ्याची नेमणूक करू नये, ज्याचा वार्षिक कार्यक्षमता अहवाल मुख्यमंत्री स्वतः लिहीत आहेत, असेही ते म्हणाले.

यापूर्वी राज्य निवडणूक आयोगावर सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यानंतर पालिका निवडणुकीत कशाप्रकारे घोळ घातला, ते जनतेसमोर आहे. हा घोळ निस्तरण्यासाठी आम्हाला सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावे लागले.

पुन्हा वशिल्याचे तट्टू : यापूर्वी भाजपने सरकारी नोकऱ्या विकल्या. आज प्रमोद सावंत सरकारात जे मंत्री आहेत, त्यांनीच असा आरोप यापूर्वी केला होता. त्याची आता पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आयोग स्वतंत्र व सक्षम असावा. अन्यथा सरकारी नोकऱ्या पुन्हा एकदा भाजपचे कार्यकर्ते आणि मंत्र्यांचे वशिल्याचे तट्टू यांनाच दिल्या जातील, असा टोला सरदेसाई यांनी लगावला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com