Goa Farming: गोव्यात भात बियाण्यांची बँक; तब्बल 161 जातींचे संवर्धन

स्थानिक जातींचे संरक्षण : ‘आयसीएआर’च्या केंद्रीय किनारी शेती व संशोधन केंद्रात उपक्रम
Farm
FarmDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आजगो, मुडगो, डामगो, बेळो, कोरगुट, सालसी, पाणयो, कोचरी दोडगी या गोव्यातील भाताच्या जातींसह पश्‍चिम घाटातील 160 हुन अधिक भाताच्या स्थानिक जातींचा संवर्धन आयसीएआरच्या केंद्रीय किनारी शेती आणि संशोधन केंद्रात सुरू आहे. सध्या 90जातींची कापणी झाली आहे. उशिरा येणाऱ्या उर्वरित भात जातींची 15 दिवसांत कापणी सुरू होईल, अशी माहिती गोवा धान भात जातीचे जनक डॉ. के. मनोहर यांनी दिली.

(Rice Seed Bank in Goa; Conservation of as many as 161 species)

Farm
Global Expo India conference: ...तर गोवा सॉफ्टवेअर, हार्डवेअर उत्पादनासाठी ओळखला जाईल

ते गेली 15 ते 16 वर्षे पश्‍चिम घाटातील भाताच्या जातींचे संवर्धनाचे काम करत आहे. यात गोव्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाताच्या जातींचा समावेश आहे. बहुतांश जाती या दुर्मिळ आणि कमी प्रमाणात मिळणाऱ्या पण स्थानिक शेतकऱ्यांनी संभाळून ठेवलेल्या होत्या. या मूळ जाती असल्याने कीड विरोधी आणि उत्तम प्रतीचे पीक देणाऱ्या आहेत.

याशिवाय वेगवेगळ्या भूभागात उगवणाऱ्या आहेत. यात डोंगराळ आणि कमी पाण्यावर येणाऱ्या, सकल आणि कमी पाण्यावर येणाऱ्या आणि दलदलीत येणाऱ्या जातींचा समावेश आहे. राज्यात खाजन जमिनीचे प्रमाण मोठे आहे. या जमिनीत पूर्वी कोरगुटसारख्या अनेक जाती अस्तित्वात होत्या. मात्र, सध्या त्या नामशेष झाल्या आहेत. म्हणूनच जुन्या जातींचे संवर्धन सुरू आहे. त्या आधारे नव्या हायब्रीड जाती शोधण्याचे कामही सुरू आहे.

Farm
D. D. Kosambi Thought Festival रद्द केल्यानंतर नाराजीचे वातावरण; ऑनलाईन विचार महोत्सवासाठी हालचाली

40 वर्षांत 12 हजार जाती नष्ट

ग्लोबल वॉर्मिंग, वातावरणातील बदल व योग्य संवर्धनाच्या अभावामुळे गेल्या 40 वर्षांत देशातील 24 हजारांपैकी 12 हजार भाताच्या जाती कायमच्या नष्ट झाल्या आहेत. उर्वरित जातींचे संवर्धन न झाल्यास त्या देखील गमावून बसू अशी भीती शास्त्रज्ञांना वाटते. या जातींमध्ये चांगली रोगप्रतिकार शक्ती असते. विविध वातावरणात उत्पन्न देण्याची आणि प्रतिकूल वातावरणात टिकून राहण्याची गुणवत्ताही असते. काही जाती कमी उंचीच्या तर काही जाती उंचीच्या आणि वेगवेगळ्या काळाने पीक देणाऱ्या आहेत.

या जातींचे जतन : गोव्यात जतन केलेल्या भाताच्या जातींमध्ये गोव्यातल्या आजगो, मुडगो, डामगो, बेळो, कोरगुट, सालसी, पाणयो, कोचरी, दोडगी, सिड्डओ तसेच कर्नाटकामधील कग्गा, जडबत्ता, खाराबत्ता, गुडदाणी, शिमिगो, मैसूर सन्ना महाराष्ट्रातील खारेमुणगे, खारारट्टा, बुरारट्टा, जिरगा, मुरगोडी या जातींचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com