Gomantak Exclusive: लोकसभेवेळीही सरकारविरोधात उभा ठाकणार- विजय सरदेसाई

Gomantak Exclusive: लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Vijai Sardesai
Vijai SardesaiDainik Gomantak

Gomantak Exclusive: ‘गोमन्तक टीव्ही’वरील ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात संपादक-संचालक राजू नायक यांनी शनिवारी 24 सप्टेंबरला गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांच्‍याशी वार्तालाप केला. त्यात सरदेसाई यांनी आपल्या पक्षाची भूमिका आणि सध्‍याच्‍या राजकीय घडामोडींविषयी मत मांडले. ‘गोमन्तक’मध्ये प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत गोवा फॉरवर्ड पक्ष कदापि कॉंग्रेसमध्ये विलीन करणार नाही, अशी भूमिका सरदेसाई यांनी स्पष्ट केली होती. मुलाखतीच्या उर्वरित भागात स्वत:च्या पक्षवाढीविषयीचे धोरण त्यांनी सांगितले, तसेच सरकारच्या नाकर्तेपणावरही बोट ठेवले. लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गोवा फॉरवर्ड अजून राज्यभर पसरलेला नाही. पक्षवाढीच्या आव्हानाकडे तुम्ही कसे पाहता?

यापूर्वी गोवा फॉरवर्डने शिवोली, साळगावात विधानसभा निवडणूक जिंकली. त्यावेळी दयानंद मांद्रेकर हे पडतील, असा कोणीही विचार केला नव्हता. आमच्याकडेही चांगले नेते आहेत. लोकसभेसाठीही आम्ही सज्ज आहोत.

पक्षवाढीसाठी कोणते धोरण आहे?

मनोहर पर्रीकरांच्या वेळी त्यांच्यासोबत दोघे-तिघेच दिसत होते. पण सध्या कोण कार्यरत आहेत ते दिसते. आम्ही पक्ष वाढविणार आहोत. जी प्रकरणे आम्ही हाती घेत आहोत, त्यावर विधानसभेत बोलतो. केवळ आवाज उठवून विषय सोडून देत नाही, तर त्याविषयी न्यायालयातही जात आहोत.

Vijai Sardesai
Vijay Sardesai: विकासाच्या नावाखाली केलेले पक्षांतर हा राजकीय व्यभिचार; विजय सरदेसाई

मडगाव नगराध्यक्षांच्या अविश्‍वासाविषयी काय सांगाल?

लोकशाही कोठे आहे? दिगंबर कामत यांना आम्ही ‘टीम बीजेपी’ म्हणतो. कामत यांचे कालचेच मत पहा. कामत यापूर्वी सर्वांना बरोबर घेऊन जाणारे होते. आता ते ‘मडगावातील नगरसेवकांनी नारळावर हात ठेवला’, असे सांगतात. त्यामुळे ही भ्रष्ट निवडणूक म्हणावी लागेल.

मडगाव नगराध्यक्ष निवडणुकीवेळी गुप्त मतदान घेतले नाही, याबाबत भूमिका काय?

आम्ही गुप्त मतदान घेऊच नये म्हणून न्यायालयात जाणार आहोत. घन:श्‍याम शिरोडकर यांनीही गुप्त मतदान घेणार नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे विरोधी पक्षमुक्त गोवा, अशी प्रथा रूढ होईल.

Vijai Sardesai
Goa Crime : अपहरण करत पैसे लुटल्याचा गंभीर आरोप; दोघे अटकेत

सत्ताधारी पक्षाविरोधात विधानसभेत आणि बाहेर कसा लढा देणार?

नगर नियोजन खात्यातील कायदा दुरुस्तीविषयी काही पक्षांची वेगवेगळी आंदोलने सुरू आहेत. असे करून चालणार नाही. गोवा सांभाळायचा असेल तर सर्वांनी संघटित व्हावे लागेल. पण सध्या ‘आम्हाला किती पदे मिळणार’, याचा विचार जो तो करतो आहे. सध्या काही पक्ष काँग्रेसची जागा घेऊ पाहात आहेत. यापूर्वी पर्रीकर यांनी मगोपच्या जागा घेतल्या; पण त्यांनी मगोप संपवला नाही. त्यांनी केवळ मतदार आपल्याकडे वळविले. पण पर्रीकर यांना मानणाऱ्या गटाचे जे लोक आहेत, त्यातील एकही माणूस प्रमोद सावंतांना मानत नाही.

कामत यांना घेतल्यानंतर भाजपच्या कोअर कमिटीने मान हलवून होकार दिलाच ना?

कामतांबरोबर लोक कुठे आहेत? मडगावसह जे आठजण सोडून गेले, त्या सर्व मतदारसंघांमध्ये आम्ही आमचे कार्यालय सुरू करू. आम्हाला प्रबळ नेता घ्यायचा नाही. आम्हाला जिंकण्यासाठी नवे नेते तयार करावे लागतील.

Vijai Sardesai
Goa Fraud : 3 कोटीला गंडा घालणाऱ्या 12 जणांवर गुन्हा दाखल; दोघे ताब्यात

विलिनीकरण किंवा काँग्रेसशी युती करा असे लोकांचे म्हणणे आहे, त्याविषयी काय मत आहे?

काँग्रेसचे सध्या जे खासदार आहेत, त्यांनी पर्रीकरांच्या विरोधात जे काही वक्तव्य केले, त्यातून त्यांनी लोकांची सहानुभूती गमावली आहे. अशा व्यक्तीला जर उमेदवारी दिली जाणार असेल, तर आम्ही पाठिंबा देणार नाही. उमेदवार हा सर्वांमते ठरवला जावा. ड्रग्सविषयी मुख्यमंत्र्यांनी सल्लागार नेमावा, असे दक्षिण गोव्यातील खासदारांचे मत, हे काय आहे?

लोकसभेसाठी कॉंग्रेसशी युती करूया, असा प्रस्ताव आला तर तसे उमेदवार आहेत का?

निश्‍चितच...शंभर टक्के आहेत. आमच्याकडे भाजपविरोधी विचारांचे उमेदवार आहेत. या सरकारच्या विरोधात राज्यभर वातावरण तयार करणे कठीण नाही. लोकांमध्ये राग आहे, तो धागा पकडून सरकारविरोधात लढा उभारता येईल. आमच्याकडे अजून पूर्ण एक वर्ष आहे. आम्ही काँग्रेस पक्ष सोडून का गेलो, त्या पक्षात सध्या आहेत त्यांचे स्थान काय आहे? या सर्वांचा साकल्याने विचार करावा लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com