Goa Fraud : 3 कोटीला गंडा घालणाऱ्या 12 जणांवर गुन्हा दाखल; दोघे ताब्यात

गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केली कारवाई
Fraud Case
Fraud CaseDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील अनेकांना गुंतवणूकीच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या बिहारचा एका भामट्याला गोवा आणि नेपाळ पोलिसांनी अटक केले. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा गुंतवणुकीसाठी दुप्पट परतावा देण्याचे आश्वासन देऊन अनेक गोवेकरांची फसवणूक केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(goa police 12 booked 2 held for cheating investors to the tune of 3 cr)

Fraud Case
Online Fraud मेसेजपासून सावधान! नोकरीचा हा फंडा पडू शकतो महागात

मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतून दोघांना गुंतवणुकीसाठी दुप्पट परतावा देण्याचे आश्वासन देऊन अनेक गोवावासीयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओसी)अटक केली आहे. फसवणूक करणाऱ्यांनी विविध गुंतवणूदारांकडून अंदाजे 3 कोटी रुपये उकळले असल्याची माहिती समोर आली आहे.

Fraud Case
Chorla Ghat : चोर्ला घाटातून बंदी असतानाही अवजड वाहतूक सुरुच

आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक रझाशाद शेख यांनी 8 जून रोजी 'युडिवो मार्केटिंग' या कंपनीच्या नावाखाली योजना चालवणाऱ्या तीन जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या कंपनीचे नोएडा, उत्तर प्रदेश आणि आर्ले , फातोर्डा येथे कार्यालये होती. ज्याद्वारे नागरिकांची फसवणूक केली जात होती.

या प्रकरणात युडिवो मार्केटिंग कंपनीचे राष्ट्रीय प्रवर्तक कंपनी संचालक विजय कुमार जैस्वाल आणि व्यवस्थापकीय संचालक रश्मी जैस्वाल यांच्यासह कंपनीचे राष्ट्रीय प्रवर्तक सुभाष चंद्रा आणि 9 एजंट वीणा कुडाव, दीक्षा नाईक, सुधीर नाईक, सिबा साधक, सुरेश झरेकर, कृष्णा यादव, सुप्रिया सावळ, प्रदीप शिवलिंगकर, प्रसन्न नाईक. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक रझाशाद शेख म्हणाले की, “एजंट आणि त्यांच्या सहयोगींनी गुंतवणूकदारांना विविध योजना ऑफर केल्या. जर एखाद्या व्यक्तीने त्यांच्या कंपनीमध्ये 11,000 रुपये गुंतवले, तर सहा महिन्यांनंतर त्याला 23,400 रुपये आणि आणखी सात महिन्यांत दरमहा 2,000 रुपये परत देण्याचे वचन दिले होते,”

दुसऱ्या योजनेत, जर एखाद्या व्यक्तीने 1.21 लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर त्याला 10 महिन्यांसाठी दरमहा 9,000 रुपये आणि त्यानंतर 2.34 लाख रुपये देण्याचे वचन दिले होते. “तिसर्‍या योजनेनुसार, त्यांच्या कंपनीत रु. 28,500 गुंतवणार्‍या व्यक्तीला 10 महिन्यांसाठी दरमहा रु 2,000 आणि 12 महिने पूर्ण झाल्यावर रु. 20,000 आणि 18 महिने पूर्ण झाल्यावर आणखी रु. 20,000 देण्याचे वचन दिले होते,”

योजनांची जाहिरात पॅम्प्लेटद्वारे करत केली फसवणूक

“गोव्यातील एक पथक 19 सप्टेंबर रोजी नोएडा आणि दिल्लीला आरोपींचा शोध घेण्यासाठी गेले आणि 23 सप्टेंबर रोजी सुभाष चंद्राला अटक केली. त्यानंतर फरश बाजार पोलिस स्टेशनच्या मदतीने आरोपीला करकरडुमे कोर्ट, शाहदरा, दिल्ली येथे हजर केले असता दोन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मिळाली. त्याला लवकरच गोवा न्यायालयात हजर केले जाईल,” असे शेख म्हणाले. आरोपींवर प्राइज चिट्स आणि मनी सर्कुलेशन स्कीम्स (बंदी) कायदा, 1978 आणि गोवा प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स (आर्थिक आस्थापने) कायदा, 1999 च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com