Mahadayi Water Issue : म्हादईबाबत दिगंबर कामत हेच खरे खलनायक! विजय सरदेसाईंचा आरोप

लवाद मंजूर करण्यास तेच कारणीभूत
Vijai Sardesai on Mahadayi Water Dispute
Vijai Sardesai on Mahadayi Water DisputeDainik Gomantak
Published on
Updated on

Vijay Sardesai Slams Digambar Kamat on Mahadayi Water Dispute: गोव्याची म्हादईबाबतची केस कमकुवत होण्यास माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हेच मुख्यतः कारणीभूत आहेत. ते मुख्यमंत्री असतानाच त्यांनी सर्वोच्च न्यायालयातून याचिका मागे घेतली.

हे जर झाले नसते तर आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयात गोव्याचा विजयही झाला असता, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सांगितले.

आज फातोर्डा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हादईबाबत जर कोण खरे खलनायक असतील तर ते दिगंबर कामत हेच आहेत. ते मुख्यमंत्री असताना हा विवाद जल तंटा लवादासमोर न्यायला त्यांनी मान्यता दिली. गोव्याची बाजू येथेच कमकुवत झाली, आसा आरोप सरदेसाई यांनी केला.

Vijai Sardesai on Mahadayi Water Dispute
Panjim Accident : पुन्हा रस्त्यात कलंडला ट्रक; स्मार्ट पणजीत गेल्या पंधरा दिवसातील तिसरी घटना

प्रशासनाकडून अजूनही स्पष्ट परवानगी मिळत नसल्याने आपण यावेळी फातोर्डा येथे ‘बिग ब्लास्ट’ हा उत्सव साजरा करत नाही, असे जाहीर करण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती.

त्यावेळी या उत्सवात म्हादईचा तसेच कोळशाचा विषय येईल, या भीतीने ही परवानगी अडवून ठेवली आहे. यासाठी दिगंबर कामत यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणला, असा आरोप त्यांनी केला.

2012 मध्ये आपल्याला काँग्रेसची उमेदवारी मिळू नये यासाठी कारस्थाने केली गेली त्यात कामत यांचाही हात होता. आपल्याला ही गोष्ट खुद्द राहुल गांधी यांनी सांगितली.

मुख्यमंत्री आपल्या शेजारील मतदारसंघातून त्यांना हव्या त्या उमेदवाराला उमेदवारी देऊ शकले नसते का, असा सवालही गांधी यांनी आपल्याशी बोलताना केल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

अभद्र युतीमुळेच विकास खंडित

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक हे त्रिकूट एकत्र येऊन अभद्र युती केली आहे. तेच आमच्या कार्निव्हलविरुद्ध आहेत. मडगाव आणि फातोर्डा या दोन्ही शहरांत विकास होऊ नये अशीच त्यांची इच्छा असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.

म्हादईच्या निकालाबाबत अाता गळा काढणारे विजय सरदेसाई जेव्हा सत्तेत होते आणि लवादाने पाणी वाटपाचा निर्णय दिला त्यावेळी ‘हा गोव्याचा विजय’, अशी प्रतिक्रिया त्यांनी का दिली होती?

म्हादई पाणी वाटपसंदर्भात निर्णय घेण्यासाठी लवाद मी मुख्यमंत्री असताना जरी झाला असला तरी तो स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने त्यापूर्वीच तयारी केली होती आणि आंतरराज्य पाणी तंटे आतापर्यंत लवादानीच सोडविले आहेत.

2012 मध्ये विजय सरदेसाई यांना काँग्रेसची उमेदवारी कुणी नाकारली हे सर्वांना माहीत आहे. मडगाव शिमगोत्सव मिरवणुकीबद्दल बोलायचे झाल्यास तो निर्णय मी घेतलेला नाही. तो पालिका मंडळाने घेतला आहे. फातोर्डा तेथील कार्निव्हल उत्सव बंद करण्यासाठी मी कुणावरही दबाव आणला नाही. - दिगंबर कामत, आमदार, मडगाव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

goa election 2027 salcete key constituencies
Digambar Kamat Porvorim flyover announcement
vijai sardesai warns goa govt
Digambar Kamat
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com