विजय मर्चंट करंडक क्रिकेटमध्ये गोव्याच्या कर्णधारपदी समर्थ राणे

सूरत येथे एक डिसेंबरपासून १६ वर्षांखालील स्पर्धा
Vijay Merchant Cup Cricket
Vijay Merchant Cup CricketDainik Gomantak

Vijay Merchant Cup Cricket: विजय मर्चंट करंडक १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी गोव्याचा संघ जाहीर करण्यात आला असून समर्थ राणे संघाचे नेतृत्व करेल. आराध्य गोयल संघाला उपकर्णधार आहे.

Vijay Merchant Cup Cricket
IND vs AUS, 3rd T20I: ऑस्ट्रेलिया संघात हेडचे कमबॅक, तर भारतीय संघातही मोठा बदल, पाहा 'प्लेइंग-11'

स्पर्धेला एक डिसेंबरपासून गुजरातमधील सूरत येथे सुरवात होईल. स्पर्धेतील सामने प्रत्येकी तीन दिवसीय आहेत. गोव्याच्या गटात सौराष्ट्र, हैदराबाद, बंगाल, हरियाना व मध्य प्रदेश या संघांचा समावेश आहे.

गोव्याचा संघ: समर्थ राणे (कर्णधार), आराध्य गोयल (उपकर्णधार), स्वप्नेश नाईक, रेयान केरकर, प्रद्युम्न आटपाटकर, व्यंकट चिगुरुपती, साई नाईक, द्विज पालयेकर, शमीक कामत, अथर्व देविदास, जय कांगुरी, संचित नाईक, नितीन घाडी, तनीश तेंडुलकर, मनहित कांगुरी, सुदित गुरव, दक्ष पैंगीणकर, ओम खांडोळकर, राखीव ः गौरव नाईक, आशुतोष तेंबकर, राज बांदेकर, कुशल नाईक.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com