कॅसिनोंमध्ये बेकायदा लाइव्ह गेमिंग सुरूच; पोस्टाच्या स्कॅमनंतर सरदेसाईंचे आणखी एक स्टिंग ऑपरेशन, शेअर केला VIDEO

Illegal Live Gaming: गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख आणि आमदार विजय सरदेसाईंनी गोव्यातील ऑनशोअर कॅसिनोंमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर लाइव्ह गेमिंगबाबत गंभीर आरोप केले आहेत.
Illegal Live Gaming
Illegal Live GamingDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख आणि आमदार विजय सरदेसाईंनी गोव्यातील ऑनशोअर कॅसिनोंमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर लाइव्ह गेमिंगबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सोमवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट शेअर करत हा प्रकार उघड केला.

विजय सरदेसाईंनी पोस्टमध्ये म्हटलंय की, राज्यात लाइव्ह गेमिंगची परवानगी केवळ ऑफशोअर कॅसिनोंमध्ये आहे, मात्र नियमांचे उल्लंघन करत ऑनशोअर कॅसिनोंमध्ये हे खेळ खुलेआम सुरू आहेत. या संदर्भात त्यांनी तीन स्टिंग ऑपरेशन्सची माहिती दिली आहे.

Illegal Live Gaming
Goa Crime: रस्त्यावर अडवून बेदम मारहाण, 12 लाखांचे दागिने - मोबाईल पळवला; जखमी 'अंकल'च्या पार्श्वभूमीमुळे वाढली गुंतागुंत

पोस्टमध्ये सरदेसाईंनी म्हटलंय की, तीन वेगवेगळ्या ठिकाणी स्टिंग ऑपरेशन्स केले. १५ जुलै रोजी कॅसिनो गोल्ड (कांदोळी), २७ जुलै रोजी कॅसिनो अटलांटिझ (कळंगुट) आणि ३ ऑगस्ट २०२५ रोजी फिनिक्स कॅसिनो (पिर्णा) या तिन्ही ठिकाणी छुप्या पद्धतीने चित्रीकरण करण्यात आले आहे. तिन्ही ठिकाणी कॅसिनोंमध्ये हे खेळ खुलेआम सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय.

सरदेसाईंनी पोस्टसोबत शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ऑनशोअर कॅसिनोंमध्ये बेकायदेशीर लाइव्ह गेमिंग सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

Illegal Live Gaming
Goa Fake Wedding Party: ना सासरचं टेन्शन, ना खर्चाची चिंता! गोव्यात 'फेक वेडिंग' इव्हेंटनं तरूणांना दिला लग्नसोहळ्याचा अनुभव

गोव्यातील कायद्यानुसार, लाइव्ह गेमिंगसाठी परवानगी केवळ ऑफशोअर कॅसिनोंना आहे. तरीदेखील ऑनशोअर कॅसिनोंमध्ये हा प्रकार सुरू असणं म्हणजे कायद्याचे थेट उल्लंघन असल्याचं सरदेसाईंनी म्हटलंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com