Vidya Balan
Vidya BalanDainik Gomantak

IFFI 2023 : ‘डर्टी पिक्चर’ माझ्या कारकीर्दीतला टर्निंग पॉईंट: विद्या बालन

IFFI 2023 : विद्या बालन ‘परिणिता’, ‘पा’, ‘कहानी’ करताना खूप काही शिकायला मिळालं
Published on

IFFI 2023 : पणजी, : माझ्या अभिनय कारकिर्दीत ‘डर्टी पिक्चर’ हा चित्रपट टर्निंग पॉइंट ठरला. मला परिणिता, पा, कहानी यासारख्या काही चांगल्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यातून मला महान अभिनेत्यांकडून खूप काही शिकायला मिळाले, असे अभिनेत्री विद्या बालन हिने सांगितले.

कला अकादमीमध्ये संवाद सत्रात विद्या बालनने अभिनयातील तिचा अनुभव आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील तिच्या प्रवासाबद्दल सांगितले. वाणी त्रिपाठी टिक्कू हिने विद्याशी संवाद साधला.

अभिनेत्री विद्या बालनने सांगितले की, तिने आपल्या करिअरची सुरुवात ‘हम पांच’ या कार्यक्रमातून केली होती. नंतर तिने अनेक चित्रपट केले. प्रत्येक चित्रपट माझ्यासाठी खास होता पण ''डर्टी पिक्चर'' हा माझ्या अभिनय कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला.

त्याचप्रमाणे ‘पा’, ‘कहानी’ हे असे काही सिनेमे होते ज्यात मला मोठ्या कलाकारांसोबत काम करायला मिळाले आणि शिकायला मिळाले, असे बालन म्हणाली.

Vidya Balan
Goa Police: 28 पोलिस उपअधीक्षकपदांसाठी 62 जण शारीरिक चाचणीस पात्र

विशिष्ट व्यक्तिरेखेतील तिच्या लूकबद्दल सांगताना ती म्हणाली की, चित्रपटातील व्यक्तिरेखा प्रभावी व्हावी,यासाठी नवनवीन गोष्टी करायच्या असतात. प्रेक्षकांना अपरिचित असलेली नवी पात्रं करायला मला आवडतात.

गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या बायोपिकबद्दल विद्या म्हणाली की, शकुंतला देवी यांना मानवी संगणक म्हणून संबोधले जाते. या चित्रपटात मी देवीची मानवी बाजू आणि वैयक्तिक घटनांचा उलगडा करत होते.

सध्या मी फक्त काही स्क्रिप्ट्स वाचत आहे, मी संगीत ऐकत आहे आणि काही कल्पनांवर विचार करत आहे. मी एक विनोदी चित्रपट करण्यास उत्सुक आहे, असेही विद्या बालनने सांगितले.

महिलांना केल्या जाणाऱ्या बॉडी शेमिंगबद्दल विचारले असता बालन म्हणाली की, महिला स्वतःबद्दल काय विचार करतात हे जास्त महत्त्वाचे आहे.

आपण स्वतःचा द्वेष करू नये तर आपले शरीर आणि आरोग्य जसे आहे,तसे स्वीकारले पाहिजे. जेव्हा मी कॅमेऱ्याला सामोरे जाते तेव्हा मला अभिनयाशिवाय कशाचाही विचार करत नाही.

- विद्या बालन, अभिनेत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com