Ponda Muncipal Council Election : प्रभाग 13 मधून पुनाळेकर बिनविरोध, कमळ घेतले हाती

निवड होताच केला भाजपमध्ये प्रवेश
Vidhya Punalkar In BJP
Vidhya Punalkar In BJPDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

फोंडा आणि साखळी पालिकांच्या निवडणुकीसाठी दाखल केलेले सर्व उमेदवारी अर्ज छाननीमध्ये सर्व उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले. उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी आज दुपारपर्यंत अंतिम मुदत होती. दरम्यान काही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काही विरोधी उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.

Vidhya Punalkar In BJP
Flights To Goa: इंदूर बायपास करून विमान पोहोचले गोव्यात, शेकडो प्रवासी संतापले

दरम्यान, आज गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी फोंडा पालिकेच्या प्रभाग 13 मधून भाजप पुरस्कृत दर्शना नाईक यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे विद्या पुनाळेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

विद्या पुनाळेकर यांची बिनविरोध निवड होताच भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. विद्या पुनाळेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

तसेच प्रभाग 7 मधून भारत पुरोहित यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने माजी नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी यांची बिनविरोध निवड झाली आहे. या बिनविरोध निवडीमुळे विश्वनाथ दळवी यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. ते तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.

Vidhya Punalkar In BJP
Ponda Muncipal Council Election 2023: फोंड्यात माजी नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी बिनविरोध

कृषिमंत्री रवी नाईक यांचा दबदबा असलेल्या फोंडा पालिकेत प्रभाग क्रमांक 7, 13 मध्ये बिनविरोध निवडणूक झाली आहे. त्यामुळे आता 2, 15 मध्ये सर्वांत कमी 2 उमेदवार असून त्यांच्यात सरळ होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

प्रभाग क्रमांक 6 मध्ये सर्वाधिक 6 उमेदवारी अर्ज आहेत. फोंडा आणि साखळी पालिकांच्या निवडणुकीसाठी 5 मे रोजी मतदान होणार आहे तर मतमोजणी 7 मे रोजी असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Staff Selection Commission fake recruitment advertisement
Karapur One Goa Project Protest
Shivaji Maharaj Statue Goa High Court Case
Goa Congress Panaji Office Deal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com