Goa Fishing : ‘सँड बार’ नाहीत, तरीही ट्रॉलर्सना अडथळा

व्हिक्टर गोन्साल्वीस यांची माहिती; अनेक ट्रॉलर मिरामार किनाऱ्यावर अडकण्याच्या घटना
Goa: Trawler plowing at Kutban jetty.
Goa: Trawler plowing at Kutban jetty.Dainik Gomantak

Goa Fishing : मांडवीतील जलमार्ग लहान असल्याने त्याबाहेरून जाणारे ट्रॉलर किंवा बार्जेस हे मिरामार किनाऱ्यावर अडकण्याचे प्रकार घडतात. कुटबण आणि शापोराप्रमाणे ‘सँड बार’ची समस्या येथे नाही, परंतु जलमार्ग लहान असल्याने वाहतूक करणाऱ्या ट्रॉलर्सना समुद्राची भरती-ओहोटी आणि लाटांच्या प्रवाहानुसार मिरामार समुद्रात यावे लागते. कोणतीही प्रकारची चूक घडल्यास ट्रॉलर्स अडकण्याची शक्यता निर्माण होते, अशी माहिती मांडवी मच्छीमार सोसायटीचे माजी अध्यक्ष व्हिक्टर गोन्साल्वीस यांनी दिली आहे. पणजी येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

कुटबण आणि शापोरा येथे सँड बार असल्याने ट्रॉलर्सना मासेमारीसाठी जाता येत नाह, परंतु येथे ही समस्या आम्हाला नाही, पण जलमार्ग लहान असल्याने त्याबाहेर जाता येत नाही. यापूर्वी गोवा - मुंबई जहाज येथून जात होते, ते देखील जलमार्गात जायचे. कारण बाहेर गेल्यास मिरामार किनाऱ्यावर ट्रॉलर्स आणि बार्जेस अकडण्याच्या घटना घडल्या आहेत, असे गोन्साल्वीस म्हणाले.

Goa: Trawler plowing at Kutban jetty.
Goa Government : सरकारकडून तब्बल 241 टन तूरडाळीची नासाडी

मासेमारी हंगाम सुरू झाल्‍यानंतर लगेच मासेमारीसाठी ट्रॉलर्स निघत नाही. कामगार, हवामान आणि भरती-ओहोटी यांच्यावर सर्वकाही अवलंबून असते. काही ट्रॉलर्सचे कामगार आल्यानंतर ते मासेमारीसाठी जातात. तसेच, हवामान योग्य असले पाहिजे आणि भरती-ओहोटी पाहून काही ट्रॉलर्स मध्यरात्री, पहाटे आणि दुपारी निघतात, असे गोन्साल्विस यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com