यशवंत सावंत
प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोईराला यांनी ५५व्या इफ्फीमध्ये स्ट्रीमिंगच्या (ओटीटी प्लॅटफॉर्म) वाढत्या प्रभावावर भाष्य करताना या नवीन माध्यमाला मनोरंजन जगात एक गेम-चेंजर म्हणून संबोधले. स्ट्रीमिंगने नवीन कलाकारांना आपल्या कल्पना साकारण्याची संधी दिली आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रात एक नवी ऊर्जा आली असल्याचेही तिने मान्य केले.
थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याच्या अनुभवाचीही मनीषाने खूप कदर केली. ती म्हणाली, जे सच्चे सिनेप्रेमी आहेत आणि ज्यांना थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे आवडते, ते अजूनही सिनेमा चित्रपटगृहात पाहण्यातच आनंद घेतात. काहीही झाले तरी त्यांना मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहायचा असतो. त्याचबरोबर, आपण आपल्या आईसोबत स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहण्याचा आनंद घेत असल्याचेही तिने सांगितले.
एक कलाकार म्हणून मनीषा हिने नवीन गोष्टी शिकण्याची आणि नवीन प्रकारचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तिने सांगितले की, मला एकाच प्रकारच्या कामात बांधून ठेवणे आवडत नाही आणि म्हणूनच मी वेब सीरिज आणि स्ट्रीमिंगसारखे नवीन माध्यम स्वीकारले.
स्ट्रीमिंगने मनोरंजन जगात क्रांती घडवून आणली आहे. त्यामुळे नवीन कलाकारांना संधी मिळत आहेत. थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याचा अनुभव जरी अद्वितीय असला तरी स्ट्रीमिंगने घरातील मनोरंजन वाढवले आहे. एक कलाकार म्हणून नवीन गोष्टी शिकणे फार गरजेचे आहे.
स्ट्रीमिंग आणि थिएटर दोन्हीचे स्वतःचे वेगळे महत्त्व अधोरेखित करत असल्याचे मनीषा कोईराला हिने सांगितले. स्ट्रीमिंगने मनोरंजनाच्या दृष्टिकोनात बदल घडवून आला असला तरी, थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याचा अनुभव अजूनही अनेकांच्या पसंतीचा आहे. अनुभवी कलाकारांनी दोन्ही माध्यमांना स्वीकारले आहे आणि भविष्यात ही दोन्ही माध्यमे एकमेकांना पूरक राहतील, असेही तिने स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.