Vijaykumar Naik: नाट्यविश्‍वावर शोककळा! ज्येष्ठ नाट्यकर्मी विजयकुमार नाईक काळाच्या पडद्याआड...

ज्येष्ठ नाट्यकर्मी विजयकुमार विश्‍वनाथ नाईक (वय ५९) यांचे काल (गुरुवारी) सकाळी अल्प आजाराने निधन झाले
Veteran actor Vijay Kumar Naik passed away
Veteran actor Vijay Kumar Naik passed away
Published on
Updated on

Veteran actor Vijay Kumar Naik passed away

गोमंतकीय रंगभूमीवरील एक अस्वस्थ पर्व, वारखंडे - फोंडा येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी विजयकुमार विश्‍वनाथ नाईक (वय ५९) यांचे काल (गुरुवारी) सकाळी अल्प आजाराने निधन झाले. मुक्तिधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी ज्योती आणि पुत्र वरद तसेच इतर परिवार आहे.

विजू या नावाने परिचित असलेले विजयकुमार गेले काही दिवस आजारी असल्याने त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू होते. तेथून ते बरे होऊन घरी परतले होते; पण सकाळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना फोंडा आयडी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथेच त्यांचे निधन झाले.

Veteran actor Vijay Kumar Naik passed away
Panaji Smart City Issue: ‘थर्ड पार्टी ऑडिट’साठी आम्ही तयार! स्मार्ट सिटीप्रश्‍नी सीईओ रॉड्रिग्स यांचे प्रत्युत्तर

विश्‍वनाथ नाईक यांनी स्थापन केलेल्या हंस संगीत नाट्यमंडळाशी ते संबंधित होते. त्यानंतर त्यांनी हंस थिएटर ट्रेनिंग सेंटर सुरू केले आणि गावोगावी नाट्यविषयक शिबिरे घेतली आणि मुलांमधून नाट्यकलाकार घडविले. विजयकुमार नाईक यांनी अनेक नाटकांत भूमिका साकारल्या. स्वतः दिग्दर्शन करून गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक व इतर राज्यांतही त्यांनी अनेक नाट्यप्रयोग साकारले. कला अकादमीच्या नाट्य स्पर्धांतही त्यांना अनेक पारितोषिके मिळाली होती.

नाटकात वेगळे काही तरी करायचे या विचारानेच ते भारून जायचे. त्यातूनच मग ‘व्हीटीबीटी’ अर्थात विजयकुमार ट्रॅव्हलिंग बॉक्स थिएटर आकाराला आले. कोणताही पडदा नसताना चारही बाजूंनी प्रेक्षकांच्या गराड्यात या ‘व्हीटीबीटी’तून नाटक सादर करण्याची संकल्पना विजयकुमार यांनी मूर्तरूपात आणली आणि यशस्वी केली. वडील ज्येष्ठ रंगकर्मी विश्‍वनाथ नाईक यांच्या तालमीत तयार झालेल्या विजयकुमार यांना त्यांचे बंधू सोमनाथ, दिलीपकुमार आणि रवींद्र यांचेही मार्गदर्शन लाभले.

विशेष म्हणजे, रंगभूमीदिनीच ५ नोव्हेंबरला त्यांचा जन्म झाला. वयाच्या दहाव्या वर्षी विजयकुमार यांनी नाटकात प्रवेश केला. वडील विश्‍वनाथ नाईक यांच्यासोबत ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकात त्यांनी संभाजीची भूमिका साकारली आणि तेथून मग नाट्य प्रवास प्रारंभ झाला, तो सुरूच राहिला.

विजयकुमार यांच्या अंत्यदर्शनाला कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. नाट्य कलेशी निगडित कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांनी अंत्यदर्शन घेतले. कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक, मगोपचे अध्यक्ष तथा माजी मंत्री दीपक ढवळीकर, माजी आमदार लवू मामलेदार, माजी मंत्री रमाकांत खलप, राजेश वेरेकर व इतरांचा त्यात समावेश होता.

शंभरहून अधिक नाटकांचे दिग्दर्शन

विजयकुमार यांनी शंभरपेक्षा जास्त नाटकांचे दिग्दर्शन केले. शिवाय बालनाट्ये, एकांकिका, एकलनाट्य, मूकनाट्य हे प्रकारही त्यांनी यशस्वीपणे हाताळले. या नाटकांचे एकापेक्षा जास्त प्रयोग झाले. उल्लेख करण्यासारखे प्रयोग म्हणजे रायगडाला जेव्हा जाग येते, ययाती आणि देवयानी, मत्स्यगंधा, अहिल्योद्धार, हॅम्लेट, कोहंम, पाण्याखालचे बेट, दी एम्परर जोन्स, कोर्ट मार्शल व अलीकडचे पालशेतची विहीर, अशी कितीतरी नाटके त्यांनी दिग्दर्शित केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com