

वास्को: वेर्णा येथे रविवारी (ता. २८) सायंकाळी उशीरा समोरून येणाऱ्या दुचाकीला बसने ठोकरल्याने दुचाकीने पेट घेतल्याने दुचाकीचालक केल्विन इशांती परेरा (३२ ) होरपळून मरण पावला. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा केला. तसेच बसचालक जाकीर हुसेन याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केल्विन हा संगरगल्ली, गुंजी बेळगाव येथे राहत होता. तो रविवारी सायंकाळी तो दुचाकीने पणजीहून मडगावकडे चालला होता. तर बस मडगावहून वास्कोकडे चालली होती.
सदर बस वेर्णा तो वेर्णा येथील फादर आग्नेल आश्रमासमोर पोहचल्यावर समोरून येणारया केल्विनच्या दुचाकीला ठोकर मारली. यामुळे दुचाकीसह केल्विन रस्त्यावर आपटला. बसची जोरदार धडक बसल्याने त्या दुचाकीने तेथेच पेट घेतला.
यावेळी त्या दुचाकीखाली असलेल्या केल्विनने दूर होण्याचा प्रयत्न केला. तथापि आगीचा भडका उडाल्याने त्याचा प्रयत्न फोल ठरला. तेथे जमलेल्या नागरिकांनी आग विझवून केल्विनला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्याला गंभीर जखमी अवस्थेत दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेण्यात आले. मात्र, तेथे त्याला मृत घोषित केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.