Goa Agriculture: वेर्ले गावाची ‘मिनी सिमला’ बनण्याकडे वाटचाल सुरू !

वेर्ले गावाने सफरचंदांचे पीक घेण्याचा प्रयोग सुरू केला असून येत्या चार पाच वर्षांत या झाडांना फळे लागू शकतात,असे सांगण्यात येत आहे.
Goa Apple Farming
Goa Apple FarmingDainik Gomantak

Goa Apple Farming: स्ट्रॉबेरीच्या लागवडीमुळे नेत्रावळी अभयारण्य परिसरात येणाऱ्या वेर्ले या गावाला आता संपूर्ण गोव्यात ''मिनी महाबळेश्वर'' म्हणून ओळखू लागले आहेत.

आणखी पाच सहा वर्षांनी या गावाला कदाचित ''मिनी सिमला'' म्हणूनही ओळखले जाईल,अशी शक्यता नाकारता येत नाही. याचे कारण म्हणजे आता या ठिकाणी सफरचंदांचे पीक घेण्याचा प्रयोग सुरू केला असून येत्या चार पाच वर्षांत या झाडांना फळे लागू शकतात,असे सांगण्यात येत आहे.

वेर्ले हा गाव डोंगर माथ्यावर असल्याने या गावातील वातावरण एकदम थंड असते. यामुळेच 2016 साली या भागात महाबळेश्र्वरच्या धर्तीवर स्ट्रॉबेरीचे पीक घेण्यास सुरूवात केली. हा प्रयोग कल्पनेच्या पलीकडे जाऊन यशस्वी झाला. त्यामुळे आता येथे सफरचंदे पिकविता येणे शक्य आहे का याची चाचपणी होत आहे.

Goa Apple Farming
Mapusa Municipality: म्हापसा नगरपालिकेत ‘त्या’ रोजंदारी चालकाविरुद्ध सेवासमाप्तीची कारवाई

कृषी विज्ञान केंद्राने ही झाडे येथील महिला स्वयंसेवी गटांना दिली आहेत. त्या रोपट्यांची मशागत या महिला गटाच्या सदस्या घेत आहेत.

हिवाळ्यात याठिकाणी स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त अन्य कुठलेही पीक घेता येणे शक्य आहे का, हे आजमण्याचा हा प्रयत्न असल्याची माहिती येथे स्ट्रॉबेरी पीक घेणाऱ्या भूमिका महिला स्वयंसेवी गटाच्या सदस्य धन्या वेळीप यांनी दिली.

सध्या या ठिकाणीं स्ट्रॉबेरी बरोबरच कोलिफ्लॉवर, बटाटे, रताळी, कलिंगड, टमाटे तसेच तांबडी भाजी पिकवली जाते. स्ट्रॉबेरी पाहण्यासाठी या भागात दररोज असंख्य लोक येत असतात. त्यामुळे येथे पिकविलेला माल हातोहात खपतो, अशी माहिती या महिलांनी दिली.

Goa Apple Farming
Yoga: 'सूर्याची उपासना ही आपली परंपरा असून योगात कल्याणाची भावना'

सध्या जिथे स्ट्रॉबेरीचे मळे आहेत, तिथेच सफरचंदांची 19 रोपटी लावण्यात आली असून सध्या ही रोपटी दीड मीटर एवढी वाढली आहेत.

या रोपट्यांचे मोठे झाड होऊन त्याला फळं धरण्यासाठी पाच ते सहा वर्षे जाऊ शकतात. त्यानंतरच हा प्रयोग किती यशस्वी झाला, ते कळणार आहे. -मिलन गावकर, सांगे विभागीय कृषी अधिकारी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com