खडकात अडकलेली क्रूझ बोट, वार्का पॅराग्लायडिंग प्रकरणाची पर्यटन मंत्र्यांकडून गंभीर दखल; मालकांना नोटीस

Rohan Khaunte: आग्वाद येथील बोट मालकासही कारणे दाखवा नोटीस बजावल्यास त्यातून माहिती उपलब्ध होऊ शकते. या घटनांवर जी काय कारवाई करायची आहे, ती तात्काळ घेतली जाईल.
Rohan Khaunte
Rohan KhaunteDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दक्षिण गोव्यात वार्का येथे गुरुवारी पॅरासेलिंग करताना घडलेली घटना आणि उत्तर गोव्यात आग्वाद येथील खडकात अडकलेली क्रूझ बोट प्रकरणात पर्यटकांच्या जीवाशी खेळ झाल्याच्या घटनेची दखल पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी गंभीरपणे घेतली आहे. याप्रकरणी दोन्ही प्रकरणातील संबंधित मालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यास पर्यटन खात्यास आदेश दिल्याची माहिती खंवटे यांनी दिली.

मंत्रालयातून बाहेर पडत असताना शुक्रवारी त्यांना घडलेल्या घटनांविषयी खात्याची भूमिकेविषयी विचारणा केली असता ते म्हणाले की, वार्का येथे पॅरासेलिंगचा घटना घडली, त्यापूर्वीच आम्ही जलक्रीडा संघटनांबरोबर बैठक घेतली होती. याविषयी आम्ही सबंधित कारणे दाखवा नोटीस काढण्यास सांगितले आहे.

आग्वाद येथील बोट मालकासही कारणे दाखवा नोटीस बजावल्यास त्यातून माहिती उपलब्ध होऊ शकते. या घटनांवर जी काय कारवाई करायची आहे, ती तात्काळ घेतली जाईल.

Rohan Khaunte
Verca Paragliding Accident: पॅराशूट अडकले झाडात, पर्यटकांनी जीव वाचवायला मारल्या उड्या; वार्का येथील धक्कादायक प्रकार Watch Video

...तर कारवाई आवश्यक

खंवटे म्हणाले की, पर्यटांचा अनुभव महत्त्वाचा आहे. पॅरासेलिंगवाल्याने तो प्रकार डेमो करताना घडल्याचे कारण सांगितले आहे. मात्र असे डेमो हे पर्यटकांबरोबर केले जात नाहीत, हे स्पष्ट आहे.

परवाच जलक्रीडा संघटनांना बोलावून त्यांच्या समस्या आम्ही ऐकून घेतल्या होत्या. त्या समस्या सोडविण्यासाठी आम्हाला त्यांचे सहकार्य आवश्यक आहे.

Rohan Khaunte
Boat Accident: स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट उलटली! 49 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता; 17 जणांना वाचवण्यात यश

पर्यटन क्षेत्रात जे गोंयकार आहेत, ते पर्यटनाचे राजदूत आहेत. त्यामुळे या घटनांविषयी अजिबात तडजोड केली जाणार नाही.

पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यावसायिकांनी दोन पैसे मिळवावेत, त्यांच्याकडून पर्यटकांना चांगली सेवा मिळावी अशी आमची अपेक्षा आहे.

व्यवसायात जर बेकायदेशीरपणा असेल तर त्यांच्यावर कारवाई होणेही आवश्यक आहेच, असे खंवटे यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com