Veling Priol Panchayat: वेलिंग प्रियोळ ग्रामसभा तापली! आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे फुलकार समाज संत्पत

कुंकळ्ये ग्रामपंचायत गावकऱ्यासाठी नसून परप्रांतीयांची, बिल्डर लॉबीची नागरिक संत्पत
Veling Priol Panchayat Gram Sabha
Veling Priol Panchayat Gram SabhaDainik Gomantak

Veling Priol Panchayat Gram Sabha

गेल्या ग्रामसभेत म्हार्दोळमधील जाई बागायती बिल्डर लॉबीच्या सांगण्यावरून नष्ट करण्याचा घाट घातला जात असून, त्यामध्ये महामार्ग व जाई बागायतीजवळच बेकायदेशीरपणे थाटण्यात आलेल्या सिमेंट ब्लॉक्स बनविण्याच्या आस्थापनातील परप्रांतीय गुंतले असल्याचाही संशय अनेकांकडून वेळोवेळी व्यक्त केला गेला होता.

ग्रामसभेत हाच विषय उचलून धरून येत्या दोन दिवसात पंचायतीकडून कार्यवाही करून ते आस्थापन हटवण्यात यावे. तसेच जाई बागायती नष्ट करण्याचे जे सत्र सुरू आहे, त्याला पूर्णविराम द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली होती.

मागील ग्रामसभेत स्वतः सरपंच हर्षा गावडे यांनी सुद्धा योग्य ती कार्यवाही करून ते बेकायदा आस्थापन हटविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते, परंतु आठवडा झाला तरी कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे, फुलकार समाजाकडून ग्रामपंचायतीवर काल शनिवारी धडक मोर्चा नेण्यात आला.

मे 2023 मध्ये स्वतः पीडब्लूडी खात्याने पंचायतीला ह्या बेकायदा अस्थापनावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. परंतु दहा महिने लोटले तरीही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.

कारवाई न केल्यामुळे अनेकदा आज लावण्याच्या घटना घडल्या. लाखो रुपयांची बागायती नष्ट झाल्या. पिढ्यान् पिढ्यांचे जाई चे मळे नामशेष होण्याच्या मार्गावर सध्या आहेत. या धडक मोर्चावेळी सरपंचांना कार्यवाही का केली गेली नाही असा प्रश्न फुलकार समाजाने विचारला असता, उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

कोणाच्या दबावाने ही पंचायत त्या आस्थापनावर कार्यवाही करत नाही, असा सवालही नागरिकांकडून सरपंचांना करण्यात आला. पंचायतीच्या ह्या बेकायदेशीर आणि अमानवीय, असंवेदनशील वर्तवणुकीवरून ही ग्रामपंचायतीमध्ये कारभार सांभाळणारे लोकप्रतिनिधी हे गावातील लोकांसाठी नसून बिल्डर लॉबीसाठी, परप्रांतीयासाठी काम करत असल्याचा आरोप नाईक फुलकार समाजाने केला आहे. सरकारकडून, पंचायत लोकप्रतिनिधींकडून आम्हाला कोणताच आधार मिळत नसल्याने तीव्र नाराजीही यावेळी फुलकार समाजाचे जाई बागायती शेतकऱ्यानी व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com