Goa Drink And Drive Case Tourist Driving License
म्हापसा : जेएमएफसी कोर्टाने मोटार वाहन कायदा कलम १८५अन्वये मद्यपान करून वाहन चालवल्याबद्दल कोल्हापूरच्या एका व्यक्तीला दोषी ठरवून १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच न्यायालयाने संशयिताचा वाहन परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला.
सविस्तर माहितीनुसार, वागातोर येथे २८ जुलै रोजी, रात्री ११.१८ वा.च्या सुमारास, अनुराग साळसकर (मूळ कोल्हापूर) ही व्यक्ती (एमएच १२ व्हीएफ ५०३५) क्रमांकाचे वाहन दारूच्या नशेत चालवताना पोलिस कर्मचाऱ्यांना आढळली होती. यावेळी पोलिसांनी संशयिताची ब्रेथलायझर चाचणी केली असता, त्याने दारूचे प्राशन केल्याचे आढळले. त्यानुसार, संशयितावर मोटार वाहन कायदा कलम १८५ नोंदवून, त्याचा वाहन परवाना निलंबित करण्यात आला.
दरम्यान, संशयित अनुराग साळसकर याच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले व न्यायालयासमोर त्याने गुन्हा कबूल केला. युक्तिवाद ऐकल्यानंतर, म्हापसा जेएमएफसी कोर्टाने संशयितास दोषी ठरवले व मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५नुसार त्याला १० हजार रुपये दंड ठोठावला आणि हा दंड न भरल्यास दहा दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.