Crime News : लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीचा आवळला गळा; दोघा संशयितांची कबुली

Crime News : पाच दिवस कोठडी; शुक्रवारी दाबोळी-वाडे येथील एका निर्माणाधीन इमारतीत साडेपाच वर्षांची मुलगी पहाटे ३ वाजता बेशुद्धावस्थेत तिच्या पालकांना आढळताच त्यांनी तिला चिखली उपजिल्हा इस्पितळात दाखल केले.
vasco Crime
vasco Crime Dainik Gomantak

Crime News :

वास्को, सामूहिकरित्या लैंगिक अत्याचार केल्यानंतर ‘त्या’ साडेपाच वर्षांच्या चिमुरडीचा गळा आवळून हत्या केल्याची कबुली दोघा नराधम मजुरांनी दिली असून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी बजावण्यात आली.

दाबोळी-वाडे येथील निर्माणाधीन इमारतीमध्ये एका सुरक्षा रक्षकाच्या साडेपाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर गळा दाबून हत्या केल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी २४ तासांच्या आत संशयित उपनेश कुमार (वय २२ वर्षे) आणि मुरारी कुमार (वय २४ वर्षे) या मूळ बिहार राज्यातील मजुरांना अटक केली. ते दोघे याच इमारतीत काम करत होते.

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगाव तालुक्याचे पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई, वास्कोचे पोलिस निरीक्षक कपिल नायक, उपनिरीक्षक अर्चना गावकर, रोहन मडगावकर,

रोहन नागेशकर, हवालदार संतोष भाटकर, दामोदर मयेकर, पुरुषोत्तम नाईक आणि सहकाऱ्यांनी दोन्ही आरोपींना गजाआड केले. दोन्ही संशयितांची फॉरेन्सिक विभागाच्या डॉक्टरांमार्फत तपासणी करण्यात आली, अशी माहिती पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी दिली.

vasco Crime
Goa Congress : काँग्रेसच्‍या उमेदवाराचा चावडी बाजारात प्रचार

शुक्रवारी दाबोळी-वाडे येथील एका निर्माणाधीन इमारतीत साडेपाच वर्षांची मुलगी पहाटे ३ वाजता बेशुद्धावस्थेत तिच्या पालकांना आढळताच त्यांनी तिला चिखली उपजिल्हा इस्पितळात दाखल केले.

मात्र, तेथील डॉक्टरांनी त्या मुलीला मृत घोषित केले. मुलीवर बलात्कार करून नंतर तिची निर्दयीपणे हत्या केल्याची कैफियत तिच्या आईने पोलिसांसमोर मांडली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो उत्तरीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठवला.

vasco Crime
Goa Accident Deaths: 'किलर स्टेट' गोव्यात 101 दिवसांत 71 अपघात'बळी', दिवसाआड एकाचा अंत

शुक्रवारी सायंकाळी शवचिकित्सा झाल्यावर त्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कार व खूनप्रकरणी भादंसं कलम ३०२, ३७६ पॉस्को आणि गोवा बाल कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

गळा दाबल्याने नाका-तोंडातून फेस

पोलिसांनी मृत मुलीच्या आई-वडिलांची जबानी नोंदवली. नंतर त्या इमारतीत काम करणाऱ्या २० कामगारांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच यातील दोघा मजुरांनी, आपण त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. गळा दाबल्याने मुलीच्या तोंडातून नाकातून फेस आला होता, अशी माहिती पोलिस अधीक्षक सावंत यांनी दिली.

यापूर्वी आईच्या विनयभंगाचा प्रयत्न

या प्रकरणातील दोन्ही संशयित बिहार राज्यातील असून यातील एका आरोपीने यापूर्वी आपला विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती त्या मुलीच्या आईने पोलिसांना दिली.

या मुलीवर मूळ गावी, बंगाल येथे अंतिम संस्कार करणार असल्याची माहिती त्या मुलीच्या आईने दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com