Vasco News: वास्‍कोतून २३ भाविक अमरनाथ यात्रेला रवाना

Amarnath Yatra 2024: रेल्‍वेने रवाना झालेले भक्त अमरनाथ यात्रा, वैष्णोदेवीच दर्शन घेऊन १८ जुलैला गोव्यात परतणार
Amarnath Yatra 2024: रेल्‍वेने रवाना झालेले भक्त अमरनाथ यात्रा, वैष्णोदेवीच दर्शन घेऊन १८ जुलैला गोव्यात परतणार
Vasco Amarnath Dainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी-वास्‍को येथील ‘जय भोलेनाथ भक्त मंडळ’ या संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरनाथ यात्रा आयोजित करण्‍यात आली आहे. वास्‍कोतून २३ भक्त श्री दामोदराचे दर्शन घेऊन काल रविवारी ७ जुलै रोजी यात्रेला रवाना झाले. दरम्‍यान, आमदार दाजी साळकर यांनी या भक्तांना शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.

कै. प्रकाश गलतगे यांनी १९९८ साली प्रथम ही यात्रा सुरू केली. इच्‍छुक भाविकांना सोबत घेऊन ते दरवर्षी यात्रेला जायचे. त्‍यानंतर २०१७ साली दाबोळी येथे ‘जय भोलेनाथ भक्त मंडळ’ स्‍थापन करण्‍यात आले. दरम्‍यान, २०२१ साली गलतगे यांची इहलोक यात्रा संपली. त्‍यानंतर ही परंपरा सुभाष तुळसकर, सतीश कुबल, काशिनाथ मेस्ता, निवास बोरकर, रुपेश व उमेद शिंदे तसेच इतर भक्तगणांनी पुढे सुरू ठेवली आहे.

७ जुलैला गोव्‍यातून रेल्‍वेने रवाना झालेले भक्त अमरनाथ यात्रा, वैष्णोदेवीच दर्शन घेऊन १८ जुलैला गोव्यात परतणार आहेत. या भक्तांमध्‍ये उमेश शिंदे, कल्‍पना शिंदे, सुदेश गावकर, यामिनी गावकर, अवधूत सातार्डेकर, रुपेश कुडणेकर, रितू कुडणेकर, धनंजय पार्सेकर, नीलिमा पार्सेकर, शिवा पार्सेकर, शिवानी पार्सेकर, निवास बोरकर, निविता बोरकर, महेश बोरकर, प्रताप गावस, सुचिता गावस, निखिल गावस, समीक्षा तारी, शिवानी तारी, कमलेश गवंडी, सुषमा वळवईकर, नरेश गायकवाड व सिद्धी परब यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com