Vasco Temple: पर्वरीची पुनरावृत्ती टळली; "मायमोळे वडेश्‍‍वर दामोदर देवस्थानाला धोका नाही" वास्कोच्या आमदारांचे आश्वासन

Vasco MLA Krishna Salkar: श्री वडेश्‍‍वर दामोदर देवस्थानाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालीये, मात्र स्थानिकांच्या श्रद्धेचा विचार करत बांधकाम केले जाईल अशी माहिती वास्कोच्या आमदारांनी दिली
Vadeshwar Damodar temple
Vadeshwar Damodar templeDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: काही दिवसांपूर्वी पर्वरीतील खाप्रेश्वर मंदिराच्या वादामुळे सगळीकडेच चिंतेचे वातावरण पसरले होते. पर्वरीत सुरु असलेल्या कॉरिडॉरच्या बांधकामामुळे मंदिर हटवले गेल्याने अनेकांकडून रोष व्यक्त करण्यात आला. यानंतर आता रेल्वेतर्फे संरक्षक भिंत बांधताना मायमोळे येथील श्री वडेश्‍‍वर दामोदर देवस्थानाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालीये, मात्र स्थानिकांच्या श्रद्धेचा विचार करत आणि त्याचे दाखल घेत बांधकाम केले जाईल अशी माहिती वास्कोच्या आमदारांनी दिली.

देवस्थान हा भावनिक प्रश्‍‍न

रेल्वेकडून सौरक्षक भिंतीचे बांधकाम सुरु होईल, मात्र यामध्ये मंदिराला धोका निर्माण होऊ नये यासाठी योग्य सुवर्णमध्य काढण्यात येईल, असे वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले. श्री वडेश्‍‍वर दामोदर देवस्थान हा येथील रहिवाशांचा भावनिक प्रश्‍‍न आहे. त्यामुळे रेल्वे अधिकारी वर्गानेही पूर्ण सहकार्य देण्याचे आश्‍‍वासन दिले आहे. तेथे संरक्षक भिंतीसंबंधी सीमांकन करण्यात येईल, असेही साळकर यांनी स्पष्ट केले.

वास्कोत रेल्‍वेमार्गालगतच श्री वडेश्‍‍वर दामोदर देवस्थान आहे. जेव्हा मीटरग्रेज रेलमार्ग होता तेव्हापासून सदर देवस्थान तेथे आहे. त्यानंतर तेथे ब्रॉडग्रेज रेलमार्ग तयार करण्यात आला, पुढे त्याचे दुपदरीकरण झाले. त्यावेळीही देवस्थानाला धोका निर्माण होऊ याची काळजी घेतली गेली होती.

Vadeshwar Damodar temple
Vasco Murder Case: होळीचा रंग झाला बेरंग; वास्कोत लहान भावाने मोठ्या भावाचा केला खून

आता तेथे आणखी एक अतिरिक्त रेलमार्ग प्रस्‍तावित आहे. तसेच तेथे संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे. त्यामुळे तेथील भाविकांच्या मनात देवस्थानाच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. दरम्‍यान, आमदार साळकर यांनी घटनास्‍थळी जाऊन पाहणी केली आणि स्थानिकांना मंदिराला कुठलीही हानी पोहोचणार नाही याचे आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com